शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

हर्षोल्हासात सीमोल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 01:13 IST

झेंडू, आंब्याच्या पानांचे तोरण, दारी सुरेख रांगोळी, देवीची यथासांग पूजा, साग्रसंगीत नैवेद्याची लगबग, आरती, पाटी-पुस्तकांसह सरस्वतीची पूजा, शस्त्रास्त्रे-यंत्रांची पूजा, सुग्रास भोजनासह उपवासाची समाप्ती, गाडी-सोने-गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, सायंकाळी आपट्याच्या पानांसह सोनरी शुभेच्छांची देवाणघेवाण, देवदर्शन, रावणदहन, देवीला साश्रुनयनांनी निरोप अशा मंगलमय वातावरणात नाशिककरांनी विजयादशमी साजरी केली.

नाशिक : झेंडू, आंब्याच्या पानांचे तोरण, दारी सुरेख रांगोळी, देवीची यथासांग पूजा, साग्रसंगीत नैवेद्याची लगबग, आरती, पाटी-पुस्तकांसह सरस्वतीची पूजा, शस्त्रास्त्रे-यंत्रांची पूजा, सुग्रास भोजनासह उपवासाची समाप्ती, गाडी-सोने-गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, सायंकाळी आपट्याच्या पानांसह सोनरी शुभेच्छांची देवाणघेवाण, देवदर्शन, रावणदहन, देवीला साश्रुनयनांनी निरोप अशा मंगलमय वातावरणात नाशिककरांनी विजयादशमी साजरी केली.  यंदा झेंडूचे भरघोस पीक आल्याने नाशिककरांना मुबलक प्रमाणात झेंडूची फुले उपलब्ध झाली होती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसून आली.  अनेकांनी शनिवारी सकाळीही फुले, आपट्याची पाने, पूजा साहित्य, गोड पदार्थ आदी खरेदी करण्यावर भर दिला होता. विद्यार्थ्यांनी पाटीवर सरस्वती काढत पुस्तके, वह्या यांचे गंधाक्षता, फुले वाहून पूजन केले. कारखाने, फॅक्टरींमध्ये यंत्रांचे तर पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. महिलावर्गाची पहाटेपासून सडा-रांगोळी, फुलांचे तोरण, गाड्यांना हार, पूजेची तयारी, स्वयंपाक अशी लगबग होती. अनेक घरी नवरात्रीनिमित्त नऊ दिवस उपवास करण्यात आले होते. दसºयाच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवित उपवासाची सांगता करण्यात आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाºया विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी नवनवीन साहित्याची खरेदी करण्यावर भर दिला. सत्याचाअसत्यावर विजय या संकल्पनेतून दसरा अपार उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी मित्र परिवार, नातेवाईक, हितचिंतक स्नेही आदींकडे जाऊन सोन्याचे प्रतीक असणाºया आपट्यांची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या. सायंकाळी देवदर्शनासह सीमोल्लंघनाहून परतल्यावर ज्येष्ठ सदस्यांचे, वाहनांचे औक्षण करण्यात आले.कालिकेचे दर्शन, महापूजेला गर्दीग्रामदैवत कालिका देवी मंदिरात शनिवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी, सोने वाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी मंदिर आवारात शस्त्रास्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर वास्तुविशारद संजय पाटील, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, नगररचना सहसंचालक प्रतिभा भदाणे, डॉ. प्रदीप पवार आदि मान्यवरांच्या हस्ते मंदिरात देवीची महापूजा, आरती करण्यात आली. दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत देवीला सोनेरूपी आपट्याची पाने वाहत आशीर्वाद घेतला. सीमोल्लंघनाच्या परंपरेचे पालन करीत मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवीची दर्शन घेतले.