शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या कविता क्रांतीचे प्रतीक : बेदरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:22 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले.  शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात सोमवारी (दि.१८) दक्ष नागरिक मंच आणि मैत्रविश्व ग्रुप यांच्यातर्फे सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांनी सावरकरांचे विचार रसिकांसमोर मांडताना सावरकरांचे देशप्रेम आणि त्यांच्या मनात मातृभूमीविषयी असलेली ओढ याविषयी विविध प्रसंगांसह अंदमान येथील काळ््या पाण्याच्या शिक्षेदरम्यान आलेल्या अनेक कटू अनुभवही उपस्थितांना उलगडून सांगितले. ते म्हणाले, कविता हे क्रांतीचे प्रतीक आहे, यावर सावरकरांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कवितांमधून मातृभूमीविषयी कायम कृतज्ञता व्यक्त होत राहिली.त्यांची कविता इतरांच्या किंवा स्वत:च्या आनंदासाठी कधीच नव्हती. त्यांची कविता ही मातृभूमीच्या रक्षणासाठी होती. त्यांच्या कवितांमधून सातत्याने राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडते. अंदमानच्या तुरुंगवासात त्यांनी अनंत यातना भोगत असतानाही कविता लिहिल्या. खडतर शिक्षा भोगत असतानादेखील ते डगमगले नाहीत. त्यांचे काव्य म्हणजे जणूकाही धगधगते अग्नीकुंडच होते़ त्यापासून अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती दिली त्यामुळेच त्यांच्या कविता त्यांनी भोगलेल्या वेदनांची सातत्याने जाणीव करून देत असल्याचेही बेदरकर यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक