नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाईन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थाी यांनी येथील आरोग्य केंद्रापासून जनजागृती फेरीला सुरवात केली. हनुमान मंदिर, बसस्थानक, ग्रामपंचायत, बैरागी गल्ली, प्राथमिक शाळा अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली. ‘स्वच्छता पाळा स्वाईन फ्लू टाळा’, ‘खोकतांना शिंकताना रूमाल वापरा’, ‘आजारी असल्या गर्दीत जाणे टाळा’ असे जनजागृतीचे फलक घेऊन घरोघरी स्वच्छतेचे महत्त्व आरोग्य सहाय्यक राजेंद्र सातपुते, अभिजित देशमुख, मुख्याध्यापक भारती देशपांडे आदींनी ग्रामस्थांना पटवून दिले.यावेळी पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे, सरपंच निलेश कातकाडे, उपसरपंच रोशन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी डी. झेड. बन, विजय बच्छाव, मंगला विसपुते, सारिका हंबर आदीसह विद्यार्थी जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते.चौकट- सध्या सर्वत्र स्वाईन फ्लू व साथीच्या आजारांनी नागरीक हैराण झाले आहे. स्वाईन फ्लूची शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा जनजागृतीच्या माध्यमातून या आजारांविषयी असलेले समज - गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.योगिता ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, नायगाव.
आरोग्य केंद्रातर्फे स्वाइन फ्लूबाबात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:00 IST