शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकरा महिन्यांत  ७३ बळी घेणारा ‘स्वाइन फ्लू’ ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:10 IST

शहरात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ७३ बळी घेणाºया स्वाइन फ्लूचा जोर आता ओसरत चालला असताना डेंग्यूच्या आजाराने मात्र थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत घसरलेले तपमान व बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गर्दी दवाखान्यांमध्ये दिसून येत आहे.

ठळक मुद्देडेंग्यूच्या आजाराने मात्र थैमान घातले नाशिक महापालिका हद्दीतील २६४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण आॅक्टोबर महिन्यात मनपा हद्दीतील ३३ रुग्णांना लागण

नाशिक : शहरात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ७३ बळी घेणाºया स्वाइन फ्लूचा जोर आता ओसरत चालला असताना डेंग्यूच्या आजाराने मात्र थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत घसरलेले तपमान व बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गर्दी दवाखान्यांमध्ये दिसून येत आहे.  शहरात स्वाइन फ्लूने नाशिककर बेजार झाले होते. १ जानेवारी ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक महापालिका हद्दीतील २६४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यातील ३१ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर हद्दीबाहेरील २३० रुग्णांना लागण होऊन त्यातील ४२ रुग्णांचे स्वाइन फ्लूने बळी गेले. गेल्या अकरा महिन्यांत स्वाइन फ्लूने एकूण ७३ रुग्णांचे बळी घेतले. आता तपमानात घट होऊ लागल्यानंतर स्वाइन फ्लूचा पुन्हा एकदा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच जोर ओसरताना दिसून येत आहे. दि. १ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत मनपा हद्दीतील ४, तर हद्दीबाहेरील २ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झालेली आहे. आॅक्टोबर महिन्यात मनपा हद्दीतील ३३ रुग्णांना लागण होऊन त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. कर्मचारी वर्ग अपुरा महापालिकेकडे डास प्रतिबंधक धूर व फवारणी करण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याची तक्रार आरोग्य विभागाकडून केली जात आहे. त्यामुळे घरोघरी फवारणीसाठी माणसे पोहोचू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेने तातडीने आउटसोर्सिंगने कर्मचारी भरती करून घरोघरी धूर व औषध फवारणीची मोहीम राबवावी, अशी मागणी सदस्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल