शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाहून गेलेला रस्ता चार दिवसात केला सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:05 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र ९५३ चे चौपदरीकरणाचे काम सुरू असतांना सप्तश्रृंगी गडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता वाहून गेल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहातूक सुरळीत करण्यात आली.

ठळक मुद्देचार ठिकाणी मोठ मोठ्या मोºया टाकून शेवटी रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करुन देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र ९५३ चे चौपदरीकरणाचे काम सुरू असतांना सप्तश्रृंगी गडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता वाहून गेल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहातूक सुरळीत करण्यात आली.वणी, बोरगाव, सापुतारा, वघई, वासदा, सुरत या रस्त्याचे चौपदरी करणाचे काम सुरू असून भितबारी ते धनाई मातावणी पर्यत रस्त्याचे कुठे ऐकेरी तर कुठे दोन्ही बाजू वाहतूकीसाठी खुल्या करण्यात आल्या असून दोन ठिकाणी पुलाचे काम सुरु असतांना रविवारी (दि.१४) सायंकांळी सप्तश्रृंगी गडावर व अहिवंतवाडी गड परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पांडाणे येथील पुलाच्या बांधकामासाठी पर्यायी केलेला कच्चा मातीचा रस्ता वाहून गेल्यामुळे गुजरात व महाराष्ट्र अश्या दोन राज्याचा संपर्क तुटला. बातमी सर्वत्र पसरताच विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, तहसिलदार पंकज पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता मनोज पाटील यांनी त्वरीत पुलाची पहाणी करु न त्वरीत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर कामाला सुरवात करण्यात आली. परंतू ठेकेदारांकडील अपुऱ्या सामुग्रीमुळे बंद होते. त्यानंतर बुधवारी (दि.१७) पूर्ण दिवस काम करुन अखेर रस्त्याच्या चार ठिकाणी मोठ मोठ्या मोºया टाकून शेवटी रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करुन देण्यात आला.