शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भेटवस्तूंसोबत मिठाईचा गोडवा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:35 IST

अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर आलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारू लागला असून, नवरात्रोत्सवानंतर लागलीच दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारपेठेत दिसू लागली आहे. दिवाळीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठ बहरून निघालेली असताना पणत्या, आकाशकंदील, पूजा साहित्य, कपडे यासोबतच वेगवेगळ्या व आकर्षित पॅकिंगमधील मिठाई व ड्रायफ्रुटच्या बॉक्सेसने बाजारपेठ सजली आहे.

नाशिक : अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर आलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारू लागला असून, नवरात्रोत्सवानंतर लागलीच दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारपेठेत दिसू लागली आहे. दिवाळीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठ बहरून निघालेली असताना पणत्या, आकाशकंदील, पूजा साहित्य, कपडे यासोबतच वेगवेगळ्या व आकर्षित पॅकिंगमधील मिठाई व ड्रायफ्रुटच्या बॉक्सेसने बाजारपेठ सजली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सणात गोडवा भरण्यासाठी आप्तेष्टांना भेटवस्तू देण्याची प्रथा असून, या वस्तूसोबत मिठाईच्या व ड्रायफु्रट बॉक्स भेट देऊन आपल्या आप्तेष्टांची दिवाळी गोड करण्याचे बेत नााशिककरांडून आखले जात आहेत.  गेल्या काही वर्षांपासून दीपोत्सवात आप्तेष्टांना आणि नातेवाइकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच भेटवस्तू देण्याचा ट्रेंड रुळला असून, भेटवस्तूंसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईचे स्थान हे सर्वप्रथम आहे. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवात ड्रायफ्रुट्स आणि मिठाईच्या बॉक्सला सर्वाधिक मागणी असल्याने मिठाई विके्रत्यांनी मिठाईचे वेगवेगळे प्रकार तयार केले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ मेनरोड, रविवार कारंजा, जुने नाशिक यासह कॉलेजरोड, गंगापूररोड, सातपूर, जेलरोड, सिडको, नाशिकरोड, उपनगर यांसह इतर भागात ड्रायफ्रुट व मिठाईची दुकाने थाटण्यात येत आहेत. नव्या व्हरायटीचे ड्रायफु्रट व मिठाई बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी मिठाईसोबतच ड्रायफ्रुट्स बॉक्सला नागरिक पसंती देतात. यंदादेखील स्क्वेअर, राउंड, फिश स्टाइल ड्रायफ्रुट बॉक्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ३०० रुपयांपासून ड्रायफ्रुट्स बॉक्स उपलब्ध आहेत.विविध प्रकारचे बिस्किटांचे बॉक्स उपलब्धमिठाई आणि ड्रायफ्रुटच्या जोडीला चॉकलेट बिस्किट, ड्रायफ्रुट बिस्किट यांसह इतर प्रकारच्या बिस्किटांचे बॉक्स यंदाच्या दीपोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मिठाईच्या बॉक्सची किंमत दोनशे रुपयांपासून सुरू होत असून, बिस्किटांच्या बॉक्सची किंमत २५० रुपयांपासून अधिक आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर भेटवस्तूसह या बॉक्सेसला अधिक मागणी राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक