शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

दप्तरमुक्त शाळेत बाप्पांच्या प्रसादाचा गोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:16 PM

सिन्नर : दप्तरमुक्त शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस. तालुक्यातील देवपूर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिभेवर या आनंदाच्या दिवशी लाडूचा गोडवा पसरल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.

ठळक मुद्दे कधी जेवण तर कधी पोटभर मोदकांचा प्रसाद

सिन्नर : दप्तरमुक्त शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस. तालुक्यातील देवपूर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिभेवर या आनंदाच्या दिवशी लाडूचा गोडवा पसरल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. या गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना बाप्पाचा प्रसाद म्हणून शिक्षकांकडून नेहमी वैशिष्ट्यपूर्ण मेजवानी दिली जाते. कधी जेवण तर कधी पोटभर मोदकांचा प्रसाद दिला जातो. यावर्षी मात्र विद्यार्थ्यांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद देण्याचे ठरले.शनिवारी दप्तरमुक्त शाळा राहत असल्याने यादिवशी विद्यार्थी विविध उपक्रम राबवित असतात. त्यामुळे दररोजच्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अधिक आनंददायी असतो. या आनंदात अधिक गोडवा निर्माण करण्यासाठी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी लाडूचा प्रसाद वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार गणपती आरतीनंतर तो माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही तो वाटण्यात आला. त्यामुळे दप्तरमुक्त शाळेच्या दिवशी बाप्पाच्या प्रसादाने विद्यार्थ्यांच्या जिभेवर गोडवा व मनात अपार आनंद दिसून आला. या उपक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापक आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, सुनील पगार, श्रीहरी सैंद्रे, विलास पाटील, वैशाली पाटील, एस.टी. गुरूळे, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, राजेश आहेर, दत्तात्रय आदिक, मीनानाथ जाधव, प्रा. सोपान गडाख, प्रा. रवींद्र गडाख, नारायण भालेराव, अशोक कळंबे, सतीश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.