शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे मुके प्राणी बेहाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:14 IST

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत.

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत. त्यामुळे उन्हाळी आजारांपासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिना उजाडल्यापासून तालुक्याचे तपमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करुन घेवू शकतात. मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ३० टक्के गुरे ही प्रजननक्षम असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील जनावरांची रानात भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चाऱ्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने जनावरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरिराचे तापमान १०३ ते १०७ अंशापर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्त्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावरांचा तोल जावून ते खाली कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावल्याची भीती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा चटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांची पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.----------------समर फिवरचा धोका वाढलाउन्हाच्या या तीव्रतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील तपमान वाढल्यामुळे जनावरांना समर फिवरचा धोका वाढला आहे. समर फिवरपासून जनावराांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.--------------मोकाट जनावरे आजारांचे बळीचारा व पाणीटंचाईमुळे अनेक पशूपालक आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. शहरी भागातही असे अनेक जनावरे मोकाट फिरतांना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नसल्याने मोकाट जनावरे विविध आजारांचे बळी पडत आहे. चारा व पाण्याच्या शोधात फिरणाºया जनावरांना ऊन लागुन झटके येणे व जनावरांचा तोल जावून जनावर जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक