शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेच्या सणाला मधुर आमरसाची गोडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 00:42 IST

आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून साजरी होणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येण्याची परंपरा असली, तरी यंदा लॉकडाऊनमुळे सर्व गृहिणींना सासरीच राहून अक्षय तृतीया साजरी करावी लागली. 

ठळक मुद्देलॉकडाऊनचे संकट : कोरोनाच्या सावटातही पारंपरिक पद्धतीने घरातच सण साजरा

नाशिक  : आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून साजरी होणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येण्याची परंपरा असली, तरी यंदा लॉकडाऊनमुळे सर्व गृहिणींना सासरीच राहून अक्षय तृतीया साजरी करावी लागली. आखाजीनिमित्त बहुतांश घरांमध्ये करा-केळीचे पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र, निर्बंधांमुळे अनेकांना करा-केळीचे लहान माठ आणणे शक्य न झाल्याने, गृहिणींनी घरातील कलशात पाणी भरून पूजन केले, तसेच या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी आपापल्या प्रियजनांना व्हॉट्सॲपवर शुभेच्छांचे आदानप्रदान केले.  सलग दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीया केवळ घरांमध्येच साजरी झाली. पुरातन संस्कृत ग्रंथातील संदर्भानुसार हा परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता वाढते. या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो. या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते. म्हणून या दिवशी अन्नदानासह अन्य दानधर्म करण्याचीही परंपरा आहे. मात्र, यंदाही निर्बंधामुळे नागरिकांना ते शक्य झाले नाही. मात्र, यंदाही आपत्धर्म म्हणून अनेक निर्बंध असल्यामुळे अक्षय तृतीयेचा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा आल्या. पुन्हा झोक्यांविना आखाजीपूर्वापार गावागावांमध्ये नदीकाठी मुली जमून झिम्मा, फुगडी खेळणे, नाच, गाणी म्हणण्याची प्रथा असली, तरी महानगराच्या परीघातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असल्याने, परिसरात कुठेही पारंपरिक पद्धतीने ही नाच, गाणी, झोक्यांचा खेळ रंगू शकला नाही. सण असूनही निर्बंधांमुळे कुणाला माहेरपणंच न मिळाल्याने बहुतांश गावांमध्ये झोकेच बांधले गेले नाहीत, तरीही नागरिकांनी त्यांच्या परीने घरच्या घरी सण साजरा करीत संकटकाळातही आनंदाचे क्षण शोधले. 

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम