शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

२५० कर्मचाºयांच्या हाती पुन्हा झाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:02 IST

नाशिक : महापालिकेत नियुक्ती सफाई कर्मचारी म्हणून परंतु, वर्षानुवर्षापासून राजकीय पुढारी आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे सोयीच्या विभागात कामकाज करणाºया सुमारे २५० सफाई कामगारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्या हाती झाडू सोपविला आहे. आरोग्य विभागात सफाई कर्मचाºयांची अपुरी संख्या लक्षात घेत आयुक्तांनी आरोग्य विभागात केलेल्या सफाई मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

ठळक मुद्दे२१ आयुक्तांचा दणका अन्य विभागात काम करणारे मूळ सेवेत

नाशिक : महापालिकेत नियुक्ती सफाई कर्मचारी म्हणून परंतु, वर्षानुवर्षापासून राजकीय पुढारी आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे सोयीच्या विभागात कामकाज करणाºया सुमारे २५० सफाई कामगारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्या हाती झाडू सोपविला आहे. आरोग्य विभागात सफाई कर्मचाºयांची अपुरी संख्या लक्षात घेत आयुक्तांनी आरोग्य विभागात केलेल्या सफाई मोहिमेचे स्वागत केले जात आहे.महापालिकेत सद्यस्थितीत १८९३ सफाई कामगार नियुक्त आहेत परंतु, वर्षानुवर्षापासून सुमारे ३०० हून अधिक सफाई कर्मचारी हे अन्य विविध विभागात सोयीनुसार वर्षानुवर्षापासून काम पाहत आहेत. राजकीय पक्षांचे पुढारी, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक यांचा वरदहस्त लाभल्याने सदर सफाई कर्मचाºयांना कोणी हात लावण्याची हिंमत दाखवत नव्हते. त्यामुळे सदर कर्मचारी हे रस्त्यावर झाडू मारण्याऐवजी पदाधिकारी व नगरसेवकांच्याच सेवेत अधिक होते. काही कर्मचाºयांकडे तर महत्त्वाची कामे देण्यात आलेली होती. एकीकडे सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने भरतीप्रक्रिया राबविण्याची मागणी राजकीय पक्षांसह सफाई कर्मचाºयांच्या संघटनांकडून लावून धरली जात असताना ३०० हून अधिक सफाई कामगार मात्र सोयीच्या ठिकाणी कामकाज करत होते. बदली कामगारांकडेही लक्षआयुक्तांनी शहराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अनेक सफाई कामगार हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता बदली खासगी कामगार पाठवित असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबतही तपासणी करत कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयुक्तांनी २५० सफाई कर्मचाºयांना मूळ सेवेत रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर सफाई कामगारांच्या संघटनांनी आयुक्तांची भेट घेतली परंतु, आयुक्तांनी ज्याची ज्या पदावर नियुक्ती त्याने तेच काम करण्याचा सल्ला दिला. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेतला. यावेळी, ही गोम त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सदर सफाई कर्मचाºयांना पुन्हा त्यांच्या मूळ सेवेत पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आरोग्याधिकाºयांनी २५० सफाई कर्मचाºयांना मूळ सेवेत परत जाण्याचे लेखी पत्र त्यांच्या हाती टेकवले. नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयातील ५४ सफाई कर्मचाºयांना आरोग्य विभागात मूळ सेवेत जाण्याचे आदेश देण्यात आले असून, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांचीही पंचवटी विभागात बदली करण्यात आली आहे.