शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चायनामेडऐवजी स्वदेशीने उजळणार दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:35 IST

आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या असून, आजवर भारतीय बाजारपेठेत असलेले चिनी वस्तूंचे वर्चस्व पूर्णत: मोडीत निघाले असून, ग्राहक भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी करत आहेत.

नाशिक : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने  मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या असून, आजवर भारतीय बाजारपेठेत असलेले चिनी वस्तूंचे वर्चस्व पूर्णत: मोडीत निघाले असून, ग्राहक भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी करत आहेत.  मेनरोड, पंचवटी, रविवार पेठ आदी मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्व उपनगरांमध्ये चिनी वस्तूंचे गारुड दिसत असले तरी गणेशोत्सवातही चिनी माल विशेषत: लायटिंग माळा, हॅलोजन, फोकस आदींना उठावच मिळालेला नाही. दिवाळीतही लोकांनी चिनी मालाकडे पाठ फिरवली आहे. कोणतीही खात्री नसताना माफक किंमत एवढेच वैशिष्ट असणाºया या चिनी बनावटीच्या वस्तूंना आजवर नाशिककरांची प्रथम पसंती मिळत होती. पण सीमेवरील जवानांना पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून होणारा त्रास, त्यांना चीनकडून मिळणारा पाठिंबा अशा घडामोडींमुळे ग्राहकांनी आपला मोर्चा स्वदेशी वस्तूंकडे वळविला आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लायटिंगच्या माळा, आकाशकंदील, पणत्यांची माळ, फटाके, हॅलोजन ट्यूब, डिफ्यूजर, आबालवृद्धांसाठीचे गिफ्ट, फळे, फटाके फोडण्याची बंदूक, दिवे आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. माफक दर, आवडीचे रंग, आकर्षक रंग यामुळे स्वदेशी वस्तू नाशिककरांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. आजवरच्या ग्राहकांच्या मागणीनुसार विक्रेत्यांना दुकानांमध्ये चिनी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून ठेवल्या असल्या तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालाला अजिबात उठाव नसल्याचा सूर ऐकू येत आहे. त्याऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तू दोन पैसे जास्त मोजावे लागले तरी घेण्याकडे कल दिसून येत आहे.