शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान : ९४ ग्रामपंचायतींत १८,२६२ शौचालयांची कामे पूर्ण इगतपुरी तालुक्याची स्वच्छतेकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:20 IST

पंचायत समिती प्रशासनाने केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियान योजना वेगाने राबविल्यामुळे इगतपुरी तालुक्याची वाटचाल हगणदारी-मुक्तीकडे सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे१८ हजार २६२ शौचालयांची कामे पूर्णतीन कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान

इगतपुरी : पंचायत समिती प्रशासनाने केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियान योजना वेगाने राबविल्यामुळे इगतपुरी तालुक्याची वाटचाल हगणदारी-मुक्तीकडे सुरू झाली आहे.संपूर्ण इगतपुरी तालुका हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा सभापती कल्पना हिंदोळे, उपसभापती भगवान आडोळे, गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी संयुक्तपणे शनिवारी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, पाणी व स्वच्छ भारत अभियानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनातून इगतपुरी तालुक्याने स्वच्छतेकडे झेप घेतली आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींत एकूण १८ हजार २६२ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. पंचायत समितीच्या वतीने शौचालय बांधणाºया लाभार्थींना प्रत्येकी बारा हजार याप्रमाणे तालुक्यात तब्बल तीन कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. ही संपूर्ण मोहीम यशस्वी झाली असल्याने इगतपुरी तालुक्याची मागास असलेली ओळख संपुष्टात आली आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत संपूर्ण देश हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा पुरेपूर फायदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव व त्यांच्या अधिपत्याखालील प्रशासनाने घेतला. मागील पाच वर्षांत तालुक्यात केवळ काही गावे हगणदारीमुक्त झाली होती. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी किरण जाधव यांनी दोन गुडमॉर्निंग पथकाची स्थापना केली होती. त्यामध्ये विस्तार अधिकारी यांच्यासह ग्रामसेवक व पंचायत समितीच्या अनेक कर्मचाºयांचा समावेश होता.गावोगावी प्रबोधनअंगणवाडीसेविका व पशुधन अधिकारी यांना गावे वाटून देण्यात त्या त्या गावांत प्रबोधन करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. गटविकास अधिकारी किरण जाधव व गुडमॉर्निंग पथकातील सदस्यांनी प्रत्येक गावात जाऊन हगणदारीमुक्त गावामुळे काय फायदा होतो याविषयी माहिती दिली. तसेच वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत संपूर्ण इगतपुरी तालुका हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. तांत्रिक अडचणी दूर होताच उर्वरित गावेही हगणदारीमुक्त होतील. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी हे दोनच तालुके हगणदारीमुक्त असून, त्या पाठोपाठ इतर तालुक्यांचा क्र मांक लागत आहे. गुडमॉर्निंग पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतल्याने तालुका लवकरच १०० टक्के हगणदारीमुक्त होणार आहे.