शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 10:03 IST

आडगाव शिवारातील स्मशानभूमीजवळ असलेल्या एका ओहळाजवळ मंगळवारी (22 जानेवारी) सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआडगाव शिवारातील स्मशानभूमीजवळ असलेल्या एका ओहळाजवळ मंगळवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळला आहे. बिबट्याचा अपघात नसून घातपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील कालवण तालुक्यात बिबट्याची कातडी विक्री करताना एकास वनविभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले होते.

नाशिक - आडगाव शिवारातील स्मशानभूमीजवळ असलेल्या एका ओहळाजवळ मंगळवारी (22 जानेवारी) सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना मृतावस्थेत पडलेला बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या बिबट्याच्या अंगावरचे कातडे काढण्याचा प्रयत्न केला असून सदरचा बिबट्या हा कोणीतरी अन्य ठिकाणी मारून आडगाव शिवारात आणून टाकल्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.

वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला आहे. बिबट्याचा अपघात नसून घातपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. बिबट्याची माहिती समजताच काही वन्यजीव प्रेमी संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. मृतदेहावर कोठे ही जखम नसून केवळ पाठीवरून काही प्रमाणात कातडी गायब झाल्याचे दिसते. त्यामुळे अंधश्रद्धेपोटी बिबट्याचा बळी दिला असावा अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील कालवण तालुक्यात बिबट्याची कातडी विक्री करताना एकास वनविभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले होते. तर कातडी शाबूत असून  वाहनांच्या धडकेत बिबट्या घसरला गेल्याने केवळ पाठीवरून केस निघाले आहे. किडनीच्या भागात जोरात आघात झाला असून अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बिबटया मृत्युमुखी पडल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.  तरीदेखील संपूर्ण शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर अधिक स्पष्ट होईल.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक