शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचा संशय; टँकरांची तपासणी होणार

By sandeep.bhalerao | Updated: September 8, 2023 13:56 IST

सिन्नरमध्ये दूध भेसळ लक्षात आली असली तरी जिल्ह्यात अनेक भागांत अशाप्रकारची भेसळ होत असल्याचा संशय आहे.

नाशिक: शहर, जिल्ह्यात वितरित होणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचा संशय असल्याने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. विशेषता: गुजरात राज्यातून येणारा मावा आणि खवा यांची तपासणी केली जाणार असून अचानक धाडी टाकण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यात येणाऱ्या दुधाच्या टँकर्सची देखील तपासणी केली जाणार असून भेसळयुक्त दूध आढळल्यास ते नष्ट केले जाणार आहे. जिल्हा प्रशासन याबाबत सतर्क झाले असून त्यांनी टेस्टींग व्हॅन देखील सज्ज केली आहे. 

        जिल्ह्यातील दूध विक्रेत्यांनी उच्च गुण प्रतीचे, भेसळविरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थांचीच विक्री करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पारधे यांनी केले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. गुजरात राज्यातून येणारा खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पारधे यांनी कळविले.

     सिन्नरमध्ये दूध भेसळ लक्षात आली असली तरी जिल्ह्यात अनेक भागांत अशाप्रकारची भेसळ होत असल्याचा संशय आहे. मात्र, पुरेशी यंत्रणा नसल्याने दूध भेसळीची तपासणी वेळोवेळी होत नाही. आता एक प्रकार समोर आल्याने जिल्हा प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारला आहे.  पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक नमूद नसल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनेवर जिल्हास्तरीय समितीमार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणा आहे.

टॅग्स :milkदूध