४ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिक येथे ही घटना घडली. मयत महिलेची आई शिला दिलीप भागवत (रा. पळसे, ता. सिन्नर) यांनी फिर्याद दिली. भारती पगारे हिच्यावर पती उद्धव पगारे याने चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करुन मानसिक छळ केला. तसेच विषारी औषध घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक गोपाळ करीत आहेत.
चारित्र्याचा संशय; विवाहितेची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:41 IST