शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शाळा नोंदणी लांबल्याने प्रवेशप्रक्रियेविषयी साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:45 IST

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर यावर्षी तब्बल दोन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे.

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर यावर्षी तब्बल दोन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबर अखेरपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला यावर्षी २५ फेब्रुवारीचा मुहूर्त लाभला होता. परंतु, शिक्षण विभागाची प्रवेशप्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली नसल्याने ही प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली असून, ही प्रक्रिया ५ मार्चला सुरू होणार असल्याची सूचना संकेतस्थळावर झळकत आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळा नोंदणीची प्रक्रिया अजूनही प्रलंबित असल्याने आरटीई प्रवेशप्रक्रिया सुधारित वेळापत्रक ानुसार सुरू होणार का? याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.आरटीई प्रवेशप्रक्रिया अंतर्गत शाळांना नोंदणी व पडताळणीसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ४५७ शाळांची नोंदणी व पडताळणी पूर्ण झाली आहे. यात १२१ पूर्वप्राथमिक व ५ हजार ६४३ प्राथमिक (पहिली)च्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध असणार आहे. अशा एकूण ५ हजार ७६४ जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.संकेतस्थळावर जुनीच माहितीशिक्षण विभागाने आरटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार मंगळवारी (दि.५) आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत संकेतस्थळावर नवीन शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शाळांची कोणतीही माहिती अपलोड करण्यात आलेली नव्हती. संकेतस्थळावर मागील वर्षाचीच माहिती असल्याने संबंधित शाळांची नोंदणी व पडताळणी पूर्ण झाली की नाही याविषयी पालकांमध्ये साशंकता निर्माण झाली होती.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र