शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

सावानाच्या फेरमतमोजणीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:54 IST

सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक फेरमतमोजणी प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायलयाने गुरुवार (दि. २)पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. ३१) सावानाच्या मु. शं औरंगाबादकर सभागृहात या फेरमतमोजणी प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. आता फेरमतमोजणीचे भवितव्य न्यायालयीन लढाईवर अवलंबून आहे. दरम्यान, बेळे यांनी निवडणूक अधिकारी भणगे आणि पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांच्यात संगनमत झाल्याने मतपेटी फोडण्याचा घाट घातल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

नाशिक : सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक फेरमतमोजणी प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायलयाने गुरुवार (दि. २)पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. ३१) सावानाच्या मु. शं औरंगाबादकर सभागृहात या फेरमतमोजणी प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. आता फेरमतमोजणीचे भवितव्य न्यायालयीन लढाईवर अवलंबून आहे. दरम्यान, बेळे यांनी निवडणूक अधिकारी भणगे आणि पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांच्यात संगनमत झाल्याने मतपेटी फोडण्याचा घाट घातल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने जिंकून आलेल्या जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणी विरोधात आक्षेप घेत याबाबत नाशिकच्या न्यायलयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायलयाने मंगळवारी (दि. ३१) हे आदेश दिले आहेत. मंगळवारी सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं.औरंगाबादकर सभागृहात सकाळी ११ वाजता फेरमतमोजणीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु या फेरमतमोजणीला धनंजय बेळे यांनी आक्षेप घेत ही फेरमतमोजणी करण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असून, ती थांबावी यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी भणगे, सावाना अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर आणि ग्रंथमित्र पॅनलचे पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांना समन्स बजावत मंगळवारी (दि. ३१) न्यायालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, परंतु असे न करता भणगे यांनी फेरमतमोजणीची प्रक्रिया राबविली. एकीकडे फेरमतमोजणीची प्रक्रिया आणि दुसरीकडे न्यायालयात सुरू असलेली सुनावणी असे दोन वेगवेगळे चित्र सावानाच्या सभासदांनी अनुभवले. सकाळी ११ वाजता औरंगाबादकर सभागृहात मतपेट्या आणल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतपेट्या उघडण्यात आल्या आणि मतपत्रिकांचे गठ्ठ्यांचे विलगीकरण करून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात करण्यातदेखील आली होती, परंतु याच वेळी भणगे यांना ही फेरमतमोजणी प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नाशिकचे एस. एस. रास्ते यांच्या सांगण्यावरून फोनवरून दिल्या आणि दुपारी १२.१५ वाजता ही प्रक्रिया भणगे यांनी थांबविली.ही फेरमतमोजणीची प्रक्रिया का थांबविण्यात आली, अशी विचारणा बी. जी. वाघ यांच्या प्रतिनिधी रूपल वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी भणगे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर भणगे यांनी मला ही प्रक्रिया थांबविण्याबाबत फोन आल्याचे सांगितले. परंतु अशा प्रकारे मतमोजणी थांबविण्यासाठी लेखी सूचना आवश्यक असल्याची मागणी कायम ठेवत वाघ यांचे प्रतिनिधी अमित पाटील, राहुल हारक यांनी आक्षेप घेतल्याने काहीकाळ यावेळी गोंधळ निर्माण झाला. आणि बी. जी. वाघ यांच्या प्रतिनिधींनी ही प्रक्रिया थांबविल्याची लेखीप्रत मिळावी अशी मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी अशी लेखी प्रत दिल्यानंतर हा वाद शमला.  प्रतिनिधींचा वाद संपल्यानंतर मतपेट्या भणगे आणि सरकारी कर्मचाºयांच्या हस्ते सिलबंद करण्यात आल्या. मतपेट्यांना सील लावले जात असतानाच श्याम दशपुत्रे आणि दीपक कुलकर्णी यांच्यात मतपेटीला हात लावण्यावरून बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद मिटवण्यात आला.