शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक देवळालीच्या पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:24 IST

कॅन्टोंमेट प्रशासनाने १६ सप्टेंबर पासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अँन्ड पार्किंगचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापाºयांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरवारी व्यापारी वर्गाने देवळाली कँम्प पोलीस स्टेशनला पार्कींग

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा मोर्चा : कडकडीत बंद नंतर निर्णयशुक्रवारी कडकडीत बंद पाळून कँन्टोमेंन्ट बोर्डावर मोर्चा

देवळाली कँम्प : चार दिवसांपुर्वी सुरू करण्यात आलेल्या देवळाली येथील पे अ‍ॅण्ड पार्कच्या विरोधात व्यापारी वर्गाने शुक्रवारी कडकडीत बंद पाळून कँन्टोमेंन्ट बोर्डावर मोर्चा काढल्याने तुर्त पे अ‍ॅण्ड पार्किंगला स्थगिती देण्यात आली असून, या संदर्भात भूमिका ठरविण्यासाठी कँन्टोमेंन्ट बोर्डाच्या आगामी बैठकीत निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कॅन्टोंमेट प्रशासनाने १६ सप्टेंबर पासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अँन्ड पार्किंगचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापा-यांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरवारी व्यापारी वर्गाने देवळाली कँम्प पोलीस स्टेशनला पार्कींग बाबत निवेदन देऊन पे अँन्ड पार्किंग बंद करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी या पार्किंगच्या विरोधात शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर व्यापाºयांनी मोर्चा काढून बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेतली.यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व व्यापा-यांनी अजय कुमार यांच्याशी चर्चा केली. पार्किंग योजना कशी अव्यवहारी आहे याविषयी माहिती देवून व्यापा-यांना विश्वासात न घेता त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, आगामी सण-उत्सव लक्षात घेता याबाबत तातडीने फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर पे अ‍ॅण्ड पार्कला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पे अ‍ॅण्ड पार्कचा निर्णय हा संपूर्ण बोर्डाचा असल्यामुळे त्यात फेरबदल करायचे असल्यास बोर्डाच्या सभेतच त्यावर निर्णय घेतला जाईल असे अजय कुमार यांनी सांगितले. तसेच शहराला शिस्त लागावी, शहर सुंदर व स्वच्छ असावे बाहेरुन येणाºया नागरिकांना देवळाली विषय आकर्षण निर्माण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात वाढणारी वाहतूक व वाहन संख्या लक्षात घेता पार्किंगचे नियोजन आजच करणे गरजेचे आहे असल्याचे ते म्हणाले. पे अ‍ॅण्ड पार्क बाबत बोर्डाच्या अंतीम बैठकीत लोकप्रतिनिधींसह व्यापा-यांच्या प्रतिनिधींनाही पाचारण केले जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र व्यापाºयांनी देखील आपल्याकडे येणाºया ग्राहकांना वाहन पार्किंग विषयी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी रतन चावला, प्रकाश केवलानी, उत्तम टाकळकर, संजय गोडसे, हनुमंता देवकर, सादिक कॉन्ट्रॅक्टर, मंगेश गुप्ता, गौतम गजरे, जगदीश गोडसे, सुरेश कदम आदि उपस्थित होते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक