शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डिसूझा कॉलनीतील हॉकर्स झोनला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:25 IST

महापालिकेने कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीत निश्चित केलेल्या हॉकर्स झोनविरुद्ध स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवित उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने प्रस्तावित हॉकर्स झोनला स्थगिती दिली असून, येत्या ४ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

नाशिक : महापालिकेने कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीत निश्चित केलेल्या हॉकर्स झोनविरुद्ध स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवित उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने प्रस्तावित हॉकर्स झोनला स्थगिती दिली असून, येत्या ४ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.  राष्टय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा तयार करून त्याला सन २०१६ मध्ये मनसेच्या सत्ताकाळात महासभेची मान्यता घेतली होती. त्यानंतर आता प्रस्तावित हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीतील टेनिस कोर्टलगतच्या रस्त्यांवर हॉकर्स झोन निश्चित केला होता. दोन-अडीच वर्षांपूर्वी महापालिकेने एसटी कॉलनीतील ५४ टपऱ्या हटविण्याची कारवाई केल्यानंतर संबंधित व्यावसायिकांचे डिसूझा कॉलनीतील हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन करण्याचे नियोजन होते. टेनिस कोर्टलगतच्या जागेत शिलाईकाम करणारे व्यावसायिक तसेच चर्मकार यांना जागा दिली जाणार होती, तर तेथीलच दुसºया जागेत फळ व भाजीपाला विक्रेत्यांना बसविण्यात येणार होते. त्यानुसार महापालिकेने हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू केली असता, स्थानिक रहिवाशांनी त्यास कडाडून विरोध दर्शविला. परंतु आयुक्तांनी त्याठिकाणीच हॉकर्स झोन होईल, अशी भूमिका घेतल्याने स्थानिक नागरिकांनी त्याविरोधात थेट उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत येत्या ४ जूनपर्यंत महापालिकेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. यावेळी महापालिकेच्या वकिलाने युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला असता, न्यायालयानेच एवढी घाई कशासाठी, असा सवाल करत महापालिकेला खडसावल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सन २०१६ मध्ये महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा मंजूर केल्यानंतर त्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. परंतु त्यावेळी संबंधित नागरिकांनी त्यास कोणतीही हरकत घेतलेली नसल्यानेच  तेथे हॉकर्स झोन निश्चित  करण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.‘वॉक विथ कमिशनर’मध्ये प्रश्नमागील शनिवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथे ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डिसूझा कॉलनीत निश्चित करण्यात आलेल्या हॉकर्स झोनमध्ये व्यावसायिकांना बसू देण्याची मागणी विक्रेत्यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यावेळी आयुक्तांनी विभागीय अधिकाºयांना जाब विचारला असता, तेथील स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आयुक्तांनी तेथे सदस्यांच्या प्रॉपर्टी आहेत काय, असा प्रश्न करत तत्काळ हॉकर्स झोन कार्यान्वित करण्याचे आदेश विभागीय अधिकाºयांना दिले होते. परंतु आता वादच उच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका