शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सस्पेन्स, पण बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा 

By संदीप भालेराव | Updated: May 24, 2023 18:33 IST

मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी हेाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स आहे.

नाशिक: राज्यातील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार याबाबत सत्ताधाऱ्यांकडून अनेक तारखांची शक्यता सांगितली जात आहे. तर काहींनी आपणास हमखास मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे जाहीरही करून टाकले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी हेाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स असतांना आमदार बच्चू कडू यांना मात्र दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष म्हणून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

दिव्यांगांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे आणि त्यांच्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन उभारणाऱ्या बच्च कडू यांनी नेहमीच दिव्यांगांचे प्रश्न मांडले. दिव्यांगांच्या सन्मानासाठी आणि अधिकारासाठी त्यांचा स्वतंत्र विभाग असावा अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयात स्थापन करण्यात आला. त्यामुळे या विभागाचे प्रमुख म्हणून कडू यांनाच मंत्रिपद मिळू  शकते अशी चर्चा होती. 

परंतु राज्यातील अस्थिर वातावारणामुळे कोणत्याच मंत्रीपदाबाबत निर्णय होत नव्हता. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्तारची चर्चा पुन्हा जोर धरू लागली असून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावर खल सुरू झालेला आहे. मात्र आमदार बच्चू कडू यांच्या नावाचे थेट परिपत्रकच काढण्यात येऊन त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

दिव्यांगासाठी राज्यात ६ जून पासून विशेष मोहिम राबविली जाणार आहे. दिव्यांगांना त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगबांधवांची शासकीय कामे होणार आहे. यासाठीसी एक समिती देखील स्थापन करण्यात आली असून कडू यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना यासाठी मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. मंत्र्यांना असलेले सर्व अधिकारी बच्चू कडू यांना असणार आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू