शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुल कामामुळे केलेली भाडेवाढ स्थगित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:39 IST

मालेगाव : येथील नवीन बसस्थानका जवळील जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे मालेगाव व राज्यातील इतर आगाराच्या बसेसच्या वाहतूक टप्प्यामध्ये वाढ झाल्याने पंधरा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे

मालेगाव : येथील नवीन बसस्थानका जवळील जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे मालेगाव व राज्यातील इतर आगाराच्या बसेसच्या वाहतूक टप्प्यामध्ये वाढ झाल्याने पंधरा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. सदर भाडेवाढ ही अन्यायकारक असल्याची बाब शालेय विद्यार्थी व प्रवाशांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पोलीस, महापालिका प्रशासन व राज्य परिववहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जुनाआग्रारोडवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करुन बसेस पूर्ववत मार्गाने सोडाव्यात व भाडेवाढ कमी करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.जुनाआग्ररोडवर उड्डानपुलाचे काम सुरू असल्याने धुळे बाजुकडून येणाºया बसेस मनमाड चौफुली मार्गे मालेगावात येत असतात तसेच नाशिककडे जाणाºया बसेस येथील जुना बसस्थानकावर उभ्या राहतात यात सात ते आठ किलो मीटरचा वाढीव फेरा पडत असल्याचा दावा परिवहन महामंडळाच्या अधिकाºयांनी करीत १ आॅक्टोबर पासून पंधरा रुपयांची भाडेवाढ केली आहे. तालुक्यातील झोडगे व इतर गावांच्या प्रवाशांनाही आर्थिक फटका बसत आहे. याची तक्रार ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे प्रवाशांनी केल्यानंतर तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. राज्यातील पंधरा जिल्ह्यातील प्रवाशांना पंधरा रुपये भाडेवाढीचा भुर्दंड बसत आहे. हा आर्थिक त्रास कमी करावा, जुना आग्रारोडवर टोल नाका उभारुन अवजड वाहने रोखावीत केवळ बसेसला यामार्गावरुन प्रवेश द्यावा या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमावेत याची तातडीने अंमलबजावणी करुन भाडेवाढ कमी करावी अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी केल्या आहेत. बैठकीला पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, आगार प्रमुख के. बी. धनवटे, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृष्णा गोपनारायण, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, भरत देवरे, कल्पेश ब्राम्हणकर आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक