शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ-जागरण परंपरा टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 17:18 IST

खामखेडा : प्राचीन काळापासून विवाह समारंभ निर्विध्नपणे पार पडावा यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी हिन्दूधर्मात कुलधर्म, कुलाचार, करण्यासाठी जागरण-गोंधळाच्या परपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.

ठळक मुद्देखामखेडा : देवाला साकडे घालण्यासाठी केले जातात पारंपारीक विधी

खामखेडा : प्राचीन काळापासून विवाह समारंभ निर्विध्नपणे पार पडावा यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी हिन्दूधर्मात कुलधर्म, कुलाचार, करण्यासाठी जागरण-गोंधळाच्या परपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.कुटूंबातील व्यक्ति देव्हाऱ्यातील देव घेऊन जेजुरीला, खंडोबाला भेटून आणले किंवा घरातील कोणत्याही मुलामुलीचे लग्न जमले की कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या वाघ्या -मुरळीच्या जागरणाचा व कुलदेवता असलेल्या तुळजाभवानीच्या गोंधळी गिताचा कार्यक्र म करण्याची प्रथा शेकडो वर्षापासून सुरु आहे.पूर्वी या जागरण-गोंधळ कार्यक्र मासाठी जेजुरीहुन वाध्या-मुरळी येत असे. सध्या सर्वत्र लग्न सराईचा धडाका चालु आहे. ज्याच्या घरात मगलकार्य असते, त्या घरात कार्यारंभ करण्यापूर्वी जागरण-गोंधळ करण्याची परंपरा आहे. यात खंडोबाची तळी भरणे, लंगर तोडून डोक्यावरील ओझे उतरवणे, दिवटी-बुदलीत रात्रभर पेटवून ठेवणे. या जागरणासाठी रात्रभर देवदेवताचे गीत गायन, पोवाडे, देवांच्या कथा सांगितल्या जातात.या कार्यक्र मसाठी सोयरे, पाहुणे, नातेवाईक, गावातील मित्र पीावार आदिंना निमंत्रण दिले जाते.जागरण-गोंधळ असता. त्या दिवशी सायंकाळी मांसाहारी किंवा शाकाहारी जेवण दिले जाते. शक्यतोवर मांसाहारी जेवण जास्त आसते. सायंकाळी दिवटया काढून नैवेद्य दखविण्यात येतो. रात्री दहा वाजेनंतर जागरण-गोंधळ कार्यक्र माला सुरवात होते.रात्रभर विविध कार्यक्र म सुरु असतात. पहाटेच्या वेळेस लोखंडी कडी असलेली साखळीचे लंगर लावले जाते, आणि तो ज्याच्याकडे जागरण तो लोखडी लंगर तोडून डोक्यावरील ओझे उतरविले म्हणून मोकळा होतो.तेव्हा महाराष्ट्राच्या ही संस्कृतीची परंपरा असलेला जागरण-गोंधळाला आजही विशेष महत्व अजुनही ग्रामीण भागात टिकून आहे. देवीच्या गोंधळाने संसारातील गोंधळ कमी होऊन घरात सुखशांती नांदते आसा आशिर्वाद गोंधळी देतात. सध्या सर्वत्र जागरण-गोंधळ कार्यक्र म सर्वत्र चालू असल्याने वाघ्या-मुरळी या लोकांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे सध्या त्यांना मागणी मोठया प्रमाणात आहे. या जागरण-गोंधळ कार्यक्र म करणाऱ्या लोकांना काही वेळेस ज्यादा पैसही मोजावे लागतात.(फोटो ०२ गोंधळ) जागरण-गोंधळ कार्यक्र माची पूजा-विधी करतांना.