शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:45 IST

कुपोषण निर्मूलनाचा भाग म्हणून यंदाही बालविकास व आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून, या सर्व्हेक्षणात आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या बालकांची शारीरिक व आरोग्याची परिस्थिती पाहता त्यांना अतिरिक्तआहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख व पालकांचे पोषण विषयक समुपदेशनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

ठळक मुद्देआरोग्य, पोषणावर भर : ग्राम बालविकास केंद्रे कार्यान्वित

नाशिक : कुपोषण निर्मूलनाचा भाग म्हणून यंदाही बालविकास व आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून, या सर्व्हेक्षणात आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या बालकांची शारीरिक व आरोग्याची परिस्थिती पाहता त्यांना अतिरिक्तआहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख व पालकांचे पोषण विषयक समुपदेशनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार शून्य ते सहा वयोगटांतील तीव्र कुपोषित बालकांसाठी नाशिक जिल्ह्णात यावर्षीही ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. या ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यासाठी पहिल्या टप्यात उपकेंद्रनिहाय बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात येणार असून, शून्य ते ६ वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी बालकांचे सर्वेक्षण करून सर्वेक्षित सर्व बालकांची १०० टक्के वजन घेण्यात येणार आहे. यामधून जी बालके तीव्र कुपोषित असतील अशा बालकांसाठी बाल उपचार केंद्र, राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र व ग्राम बाल विकास केंद्र या माध्यमातून उपचार, पोषक आहार व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. सदर बालकांच्या पालकांना गृहभेटीद्वारे पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात येणाºया ग्रामपंचायत विकास आराखड्यात महिला व बालविकासासाठी असलेल्या निधीतून आहारावर खर्च करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सदस्यांचे याकामी सहकार्य घेण्यात येणार आहे.असून, या संदर्भात मागील वर्षी जिल्ह्णातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य