शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वडनेर परिसरात खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:25 IST

वडनेर : थोड्याफार पावसावर पेरणीची सुरुवात गाव परिसरात झाल्यानंतर आठवड्यापासून ओढ दिलेल्या पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले होते. पावसाने पुन्हा समाधानकारक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी ओढे-नाले खळाळून वाहिले तर काही ठिकाणी शेतातून बाहेर पाणी वाहत होते. दोन्हीही लेंडीनाले वाहून निघाले आहेत.

वडनेर : थोड्याफार पावसावर पेरणीची सुरुवात गाव परिसरात झाल्यानंतर आठवड्यापासून ओढ दिलेल्या पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले होते. पावसाने पुन्हा समाधानकारक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी ओढे-नाले खळाळून वाहिले तर काही ठिकाणी शेतातून बाहेर पाणी वाहत होते. दोन्हीही लेंडीनाले वाहून निघाले आहेत. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाºया मालेगाव तालुक्यातील वडनेरसह काटवण परिसरात गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने कृपादृष्टी दाखविल्याने शेतशिवार हिरवीगार होत आहे. परिसरात अल्पशा पावसावर पिकांची पेरणी केल्यानंतर चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. परिसरातील मका तसेच बाजरीची पेरणी करण्यात येत आहे. चांगल्या प्रमाणात पाणी मिळाले तर पिकात दाणे उतरतात असे म्हणतात, त्यामुळे सोमवारी झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाने हजेरी लावली असून, अल्प पावसाने तग धरून असलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर मका लागवड केली जाते. पावसाळ्यातील हुकमी पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते. मक्याबरोबरच बाजरी पेरली जाते. पेरणीची कामे जेमतेम संपण्याच्या मार्गावर आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे, परंतु लष्करी अळीची टोळधाडीची भीती कायम आहे.रस्त्यातच पावसाच्या पाण्याचे साचले डबकेनाशिक : परिसरामध्ये रस्त्यातच पावसाच्या पाण्याचे डबके तुंबलेले असून, पायी जाणारे नागरिक आणि वाहन चालविणारे चालक यांना मार्गक्र मण करताना त्रास होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता असून, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे या दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी गटार साफ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक