नाशिक : जिल्'ात प्रकल्पनिहाय सर्वेक्षित बालकांची संख्या चार लाख ३९ हजार ९४१ इतकी असून, त्यातील सर्वसाधारण बालकांची संख्या तीन लाख ८९ हजार ५४५ इतकी आहे. त्यात मध्यम व तीव्र कुपोषित बालकांची संख्या १३२८ इतकी असल्याचे उघड झाले आहे. जिल्'ात एकूण २६ बालविकास प्रकल्प असून, या प्रकल्पांतर्गत एकूण चार लाख ३९ हजार ९४१ बालकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यापैकी वजन घेतलेल्या बालकांची संख्या चार लाख २८ हजार ७३५ इतकी आहे. त्यातील सर्वसाधारण बालकांची संख्या जवळपास ९० टक्के इतकी असून, एकूण मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या ३१ हजार ७४५ इतकी आहे. ही एकूण सर्वेक्षण केलेल्या बालकांच्या आकडेवारीच्या ७.४० टक्के इतकी असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या सात हजार ४४५ इतकी असून, त्यातील मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या १०७८ इतकी आहे. तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या २५० इतकी असून, एकूण सर्वेक्षित केलेल्या बालकांच्या आकडेवारीच्या ०.०६ टक्के इतकी आहे. त्यातही २५० पैकी तीव्र गंभीर कुपोषित बालकांचे सर्वाधिक प्रमाण हे मालेगाव एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ४५ इतके आहे
जिल्'ात तेराशे बालके कुपोषित साडेचार लाख बालकांचे केले सर्वेक्षण
By admin | Updated: November 12, 2014 01:15 IST