शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या सत्तेला सुरूंग; भाजपाची विजयी घोडदौड

By admin | Updated: February 24, 2017 23:28 IST

मालेगाव : पंचायत समितीच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी; अपक्ष उमेदवार ठरणार किंगमेकर

अतुल शेवाळे : मालेगावजिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटांमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे.  गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेकडे चार जिल्हा परिषदेचे गट ताब्यात होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत दाभाडी, रावळगाव, सौंदाणे, कळवाडी या सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत आता भाजपाने या गटांमध्ये कमळ फुलविले आहे.  झोडगे गटावरील सत्ता अबाधित ठेवण्यास शिवसेनेला यश आले आहे तर वडनेर गटातील भाजपाच्या सत्तेला सुरूंग लागला आहे.  तालुक्यात प्रतिष्ठेची लढत झालेल्या कळवाडी, निमगाव, रावळगाव, सौंदाणे, दाभाडी या गटात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे व निमगाव गटातील मधुकर हिरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेने जिल्ह्यात घवघवीत यश मिळविले असले तरी तालुक्यात झालेली पिछेहाट शिवसेनेच्या जिव्हारी लागणारी आहे.  पंचायत समितीत मतदारांनी सेना व भाजपाला समान कौल दिला आहे. मालेगाव पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी व अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांच्या हातात आहेत.पंचायत समितीत मतदारांनी शिवसेनेला सहा व भाजपाला सहा असा समसमान कौल दिला आहे. पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी लागणारा  मॅजिक आकडा भाजपा व शिवसेनेकडे नसल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पंचायत समितीवर   सत्ता मिळविण्यासाठी अपक्ष व राष्ट्रवादीच्या उमेदवाराची रसद लागणार आहे. ही रसद मिळविण्यासाठी भाजपा व शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. ंभाजपाचा बालेकिल्ला असलेल्या वडनेर गटात शिवसेनेने मुसंडी मारली. गट व गणाच्या दोन्ही जागा शिवसेनेने काबीज केल्या तर भाजपाने सौंदाणे गटात मनीषा पवार यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. गणातीलही जागा राखल्या. रावळगाव गट भाजपने समाधान हिरे यांच्या रूपाने खेचून आणला. काट्याची टक्कर झालेल्या कळवाडी गटात भाजपाच्या बलवीरकौर गिल यांनी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे यांना सातवे आसमान दाखवले तर निमगाव गटात भाजपाचे जे. डी. हिरे यांनी मधुकर हिरे यांचा पराभव केला. तर दाभाडीत देराणी- जेठाणीला भारी पडली. भाजपाच्या संगिता निकम यांनी शिवसेनेच्या विद्या निकम यांना घरचा आहेर दाखविला. आमदार असताना दादा भुसे यांचा तालुक्यात करिश्मा चालत होता; मात्र आता ग्रामविकास राज्यमंत्री पद असताना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिवसेनेला जिल्हा परिषद गटातील एक जागा व पंचायत समितीची एक जागा गमावण्याची नामुष्की ओढावली तर कळवाडी, रावळगाव, निमगाव या गटातील शिवसेनेच्या उमेदवारांचा झालेला पराभव शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. भाजपाने जोरदार मुसंडी मारत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटांमध्ये सत्ता खेचून आणली आहे. शिवसेनेला केवळ दोन गटांमध्ये सत्ता टिकविता आली तर पंचायत समितीत जनतेनेच समान कौल दिला आहे. भाजपा व शिवसेनेशिवाय पर्याय नसल्यामुळे समान कौलचा निकाल समोर आला आहे. कट्टर विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय पक्षाला यापुढे चांगले दिवस येण्याची शक्यताच या दिसून येत आहे.