शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिनाकेश्वर देवस्थान सुविधांसाठी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:52 IST

नांदगाव तालुका : बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

ठळक मुद्देमुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा झाल्यानंतर सदर देवस्थान ड वर्ग वन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची परवानगी देण्यात आली

नांदगाव : तालुक्यातील जातेगावपासून उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरावर असलेल्या पुरातन श्री पिनाकेश्वर देवस्थानास वन पर्यटन स्थळ म्हणून मंजुरी मिळाल्याने त्याअनुषंगाने परिसरात विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह वनविभागाच्या अधिका-यांनी भेट देऊन सर्वेक्षण केले.सहवनसंरक्षक आर. ए. कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक राजेंद्र दौंड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील, कनिष्ठ अभियंता डी. ए. धारक, स्थापत्य अभियंता एम. पी. निकम यांनी रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंदिर परिसर सुशोभिकरण, सभामंडप दुरु स्ती, उद्यान, निवारा शेड, भंडारगृह, स्वच्छतागृह, व्यापारी संकुल उभारणे, वाहनतळ आदी कामांची सुरु वात करण्याअगोदर परिसराची पाहणी केली. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, उपसरपंच नारायण पवार, वन समिती अध्यक्ष संतोष डांगे, माजी सरपंच विजय पाटील, राजेंद्र लाठे, कैलास तुपे, पंढरीनाथ भगत, दारासिंग बिडे, शिवाजी गायकवाड, अंकुश वर्पे, नानासाहेब पवार, यमराज वाघ, विष्णू जाधव, बाळासाहेब जाधव उपस्थित होते. देवस्थानाचा वन पर्यटन विभागाकडून विकास करण्यात यावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी सन २०१६-१७ मध्ये विधानसभेत मागणी केली होती. या देवस्थानच्या ठिकाणी जाण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतून जावे लागत असल्याने, रस्ता व इतर विकासकामांना वन विभागाची परवानगी आवश्यक असते. सदरची परवानगी तातडीने मिळावी यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा झाल्यानंतर सदर देवस्थान ड वर्ग वन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची परवानगी देण्यात आली होती.

टॅग्स :Nashikनाशिक