शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सर्वेक्षण : निफाड तालुक्यात सर्वाधिक ३३८, चांदवड, कळवणमध्ये एकही नाही

By admin | Updated: February 5, 2016 22:31 IST

जिल्ह्यात ८०६ शाळाबाह्य मुले

शफीक शेख ल्ल मालेगावशासनाने बालकांना शिक्षणाचा अधिकार दिलेला असतानाही हजारो मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यात एकूण ८०६ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत.विशेष म्हणजे यात सर्वाधिक ३३८ शाळाबाह्य मुले निफाड तालुक्यात आढळून आली असून, चांदवड आणि कळवण तालुक्यात ही संख्या शून्यावर आहे. सर्वेक्षणात चांदवड शहर किंवा तालुक्यात एकही शाळाबाह्य मुलगा आढळून आला नाही हे आश्चर्य आहे.महानगरपालिका क्षेत्राचा विचार केल्यास नाशिक तालुका चार आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार असे एकूण केवळ आठ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्या तुलनेत मालेगाव महानगरपालिका हद्दीत सर्वाधिक म्हणजे २९६ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. देवळा तालुक्यात ५२, बागलाण तालुक्यात २५ आणि सिन्नर तालुक्यात ४ मुले आढळून आली आहेत. पेठ तालुक्यात १८, दिंडोरी तालुक्यात ७ आणि इगतपुरी तालुक्यात ९ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. त्र्यंबकेश्वर ३, निफाड ३३८, येवला ३३, मालेगाव ग्रामीण ३, नांदगाव १० अशी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी आहे. शासनाने बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी हा कायदा केला आहे. जिल्हाभरात हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असताना शासनाला केवळ ८०६ शाळाबाह्य मुले सर्वेक्षणात आढळून आली आहेत. दि. १५ ते ३० जानेवारीदरम्यान जिल्हाभरात राष्ट्रसेवा योजनांचे विद्यार्थी, समन्वयक, प्राथमिक शिक्षक यांच्यामार्फत शासनाने शाळाबाह्य मुले शोधण्याचे सर्वेक्षण केले. यात आढळून आलेल्या शाळाबाह्य मुलांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. १३ वर्षांचा मुलगा असल्यास त्याला सरळ सातवीत प्रवेश देऊन मागील अभ्यास पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. त्या मुलांकडून मागील वर्षाचा अभ्यास करवून घेतला जाणार आहे. यात खरंच या मुलांचा मागील इयत्तेचा अभ्यास होऊन ती शिक्षणाच्या प्रवाहात येतील का, हाच खरा प्रश्न आहे.अनेक कुटुंब दारिद्र्यात जीवन जगत आहे. ज्या लोकांना स्वत:च्या पोटभरण्यासाठी दारोदार भिक्षा मागून उपजीविका करावी लागते ती कुटुंबे मुलांना शाळेत कशी पाठवतील? कारण ही मुलेदेखील ‘भिक्षा’ मागण्यासाठी मदत करीत असतात. शासनाने हा कायदा बंधनकारक केल्यामुळे शिक्षण विभागाचे धाबे दणाणले आहे.