शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

मनपाकडून ७३२ नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:15 IST

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरापासून काटेकोर उपाययोजना केल्या आहे. विशेषत: देश-विदेशांतून आलेल्या ७३२ नागरिकांचे सर्र्वेक्षण करून प्रशासनाने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली आहे.

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरापासून काटेकोर उपाययोजना केल्या आहे. विशेषत: देश-विदेशांतून आलेल्या ७३२ नागरिकांचे सर्र्वेक्षण करून प्रशासनाने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली आहे. यातील ५८३ नागरिकांचा होम क्वारंटाइनचा कलावधी पूर्ण झाला आहे.उर्वरित नागरिकांवरदेखील विशेष नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई- पुण्याजवळ असूनदेखील नाशिक शहरात संसर्ग नियंत्रित ठेवण्यात नाशिक महापालिकेला मोठे यश मिळाले आहे. कोरोनाचा संसर्ग देशात सुरू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यात देश-विदेशांतून येणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणे तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार होम क्वॉरंटाइन ठेवण्याचे निर्देश होते.महापालिकेने त्यानुसार उपाययोजना करताना विमानतळ तसेच रेल्वे प्रशासनाकडून अलीकडील काळात नागरिक कोठून आले, त्याची माहिती घेतली व त्यांंची आरोग्य तपासणी केली आहे. नाशिकमध्ये अमेरिका, आॅस्ट्रेलिया, दुबई, इटलीसह अन्य देशांतून आलेल्या ३९९ नागरिकांची माहिती घेऊन त्याचे सर्वेक्षण केले. अन्य राज्यांत जाऊन आलेल्या ३३३ नागरिकांसह एकूण ७३२ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. यातील ५८३ नागरिकांचा १४ दिवसांचा होम क्वॉॅरंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे, तर १४९ नागरिक वैद्यकीय पथकांच्या निगराणीखाली आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून आदेश येताच कठोर उपाययोजना राबविल्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात कोरोना नियंत्रणात राहिल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.-------देश-विदेशांतूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्वरित मनपास कळवावे, असे आवाहन करण्यात आले होते किंबहूना कायद्याने ते बंधनकारक करण्यात आले होते. परंतु तसे न कळविल्याने नाशिकमध्ये अशा नागरिकांची प्राथमिक अवस्थेत तपासणी करता आली नाही आणि पुढे तेच बाधित आढळले, असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक