शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:03 IST

सटाणा/जोरण : बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वारंवार गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव व जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांना घेराव घालत नागरिकांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला.

ठळक मुद्देकपालेश्वर आरोग्य केंद्राबाहेरच ग्रामस्थांचा ठिय्या : गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

सटाणा/जोरण : बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वारंवार गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव व जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांना घेराव घालत नागरिकांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला.जोरण, किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, मोरकुरे , भिलदर, तळवाडे दिगर आदी गावांचा समावेश आहे. आदी गावातील नागरिक हे नेहमी जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात; मात्र येथील डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील नागरिकांना सुविधाच मिळत नाही. गुरुवारी सकाळी दहा वाजता परिसरातील नागरिकांनी कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहून जे संबंधित डॉक्टरांची पाहणी केली असता, सकाळी अकरा वाजेपर्यंत येथील वैद्यकीय अधिकारी तसेच काही कर्मचारी गैरहजर दिसून आलेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत आहिरराव यांना निवेदन देऊन संबंधित प्रकार उघडकीस आणून दिला व संबंधितांवर कार्यवाहीची मागणी निवेदनात केली.यावेळी राजेंद्र आहिरे प्रहार जनशक्ती तालुका उपाध्यक्ष, दीपक खरे, प्रहार जनशक्ती तालुका सचिव, मनोहर ठाकरे सरपंच, दीपक काकुळते उपसरपंच, बाळू सोनवणे, सरपंच राहुल खैरनार, उमेश काकुळते, संजय आहिरे, प्रवीण वाघ, राकेश बागुल,कपिल काकुळते, रमेश आहिरे, उमेश जगताप, नितीन काकुळते, नीलेश काकुळते, राहूल काकुळते, कैलास काकुळते,रावसाहेब आहिरे, भिला काकुळते, विक्रम काकुळते, कैलास वाघ, मनोहर सावकार आदी उपस्थित होते. (१० जोरण)-----------------------संबंधित गैरहजर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची माहिती मी वरिष्ठ कार्यालय जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवत आहे, तसेच नेहमी मुख्यालयी राहणारे डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात येणार असून, संबंधित गैरहजर डॉक्टर यांच्यावर कारवाई केली जाईल.-हेमंत आहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी, सटाणा.माझ्या वीरगाव गटातील जे संबंधित अधिकारी व कर्मचारी आहेत, त्यांनी कामात काही टाळाटाळ केली व सतत गैरहजर आढळून आल्यास व नागरिकांनी तक्रार केली तर संबंधित कर्मचारी व अधिकारी यांंच्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल.-साधना गवळी, जि.प.सदस्य, वीरगाव गट.ग्रामस्थांमध्ये संतापगेल्या एक-दोन दिवसांपूर्वी बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील अभिमन गंगाधर अहिरे व तसेच किकवारी बुद्रुक येथील शेतकरी काकाजी माला वाघ यांच्यावर मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला; मात्र जमलेल्या नागरिकांनी जवळच असलेले वागदर वस्तीत धाव घेऊन संबंधित नागरिकांना जवळच असलेले कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र रात्रीच्या वेळी कपालेश्वर आरोग्य केंद्रात कुठलाही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य