शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले
2
"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 
3
पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान
4
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय "मला सोडा,मी काहीच केलं नाहीये..."
6
Homeguard Bharti: होमगार्ड भरतीसाठी फिजिकल टेस्ट देताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, पाकिस्तान...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला थेट इशारा
8
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
9
अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?
10
Astro Tips: व्यवसाय करावासा वाटतोय, पण जमेल का ही मनात शंका? २० सेकंदात मिळेल उत्तर!
11
Swami Samartha: स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर आधी 'हे' नियम वाचा!
12
ऑफिसमधील महिला पतीला म्हणाली 'बेबी', ऐकताच हायपर झाली पत्नी! भर सोसायटीत हाय व्हॉल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ
13
आरबीआयची 'आर्थिक' ताकद वाढली! सोन्याचा साठा विक्रमी पातळीवर, बँकेच्या तिजोरीत काय-काय आहे?
14
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
15
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
16
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
17
IND vs AUS मालिकेचे वेळापत्रक BCCIने केलं जाहीर, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रंगणार 'रनसंग्राम'
18
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
19
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
20
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...

सुरगाणा, इगतपुरीत शेतकामांना वेग

By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST

सुरगाणा : तालुक्यात पावसाची नोंद झाली असून, शेतकामांना वेग आला आहे.

सुरगाणा : तालुक्यात पावसाची नोंद ठेवण्यासाठी पाच ठिकाणी डिजिटल पर्जन्यमापक बसविले असल्याने पावसाची बारकाईने नोंद होत आहे. यात एक दिवसाची पावसाची चांगली नोंद झाली असून, शेतकामांना वेग आला आहे.तालुक्यात पावसाची नोंद होण्यासाठी मागील वर्षापासून पाच ठिकाणी डिजिटल पर्जन्यमापक बसविण्यात आलेले असल्याने कुठे किती पाऊस झाला याची उपयुक्त माहिती मिळण्यास मदत होत आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत या २४ तासात सर्वाधिक ७२.४ मि.मी. पावसाची नोंद मनखेड येथे झाली असून, त्याखालोखाल बाऱ्हे येथे ७२, सुरगाणा येथे ६६.८, उंबरठाण येथे ६१.३ तर बोरगाव येथे ३२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पाचही ठिकाणची एकूण नोंद (एका दिवसाची) ३0४.९ मि.मी. एवढी आहे.सुरगाणा व परिसरात पावसाने शुक्रवारपासून कायम सातत्य ठेवले आहे. शिंदे परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे समजते. शनिवारीही दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.दरम्यान, दोन दिवस पाऊस झाला असून, अद्यापपर्यंत नदी, नाले, लहान मोठे ओहळ यांना पाणी उतरले नसल्याने तालुक्यातील पाझरतलाव, वनतळे, शेततळे, गावतळे पूर्णपणे भरू शकलेले नाहीत. मात्र जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असल्याचे बोलले जात आहे.इगतपुरी : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाचे महिनाभर ओढ दिल्याने भात आवणीची कामे थांबली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून धो धो पडणाऱ्या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. वातावरण आल्हाददायक झाले असून, परिसर हिरवाईने नटला आहे. त्यात अधूनमधून धुक्यानी झालर बघायला मिळत आहे. (वार्ताहर)