शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांवर दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर उतरू- सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 14:33 IST

नाशिक : महागाई बद्दल बोलणार्या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापार्यांवर अचानक धाडी टाकून शेतकर्यांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चातून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा ...

ठळक मुद्देचर्चेतून प्रश्न सोडवा : सरकार शेतकरी विरोधी

नाशिक : महागाई बद्दल बोलणार्या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापार्यांवर अचानक धाडी टाकून शेतकर्यांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चातून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी दिला.‘जागर युवा संवादाचा’ कार्यक्र मानिमित्त मविप्र संस्थेच्या अ‍ॅड.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्र संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे उपस्थित होते. जीएसटी, कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी धोरणांविषयी त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर टिका केली. खा.सुळे म्हणाल्या, की कोणत्याही देशात २८ टक्के कर दालला जात नाही. जीएसटी लागू करण्यापूर्वी करदात्यांना साधारणत: वर्षभर अवधी देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आम्ही केली होती. मात्र, निर्णय घेताना परिणामांची मिमांसा न करणाºया सरकाराने आता यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. कर्जमाफीचा अर्ज चुकला की फौजदारी, व्यावसायिकांनी जीएसटी नाही भरला की फौजदारी करायची. त्यामुळे या सकारला काम करण्यापेक्षा फौजदारी करण्यामध्ये फार रस असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.सरकार योग्य निर्णय घेते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. निवडणूक निकालांच्या वातावरणातून बाहेर पडून या सरकारने आता सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या, शेतकरी-व्यापाºयांशी चर्चा करु न त्यांना जाणवणाºया समस्यांवर वेळीच तोडगा काढवा. केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास भविष्यात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही खा.सुळे यांनी याप्रसंगी दिला.