शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडूनच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:09 IST

कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपविली आहे, त्यांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडावा, ही आश्चर्याची व खेदजनक बाब म्हणावी लागेल. भरदिवसा फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही सोमवारी (दि.२१) चक्क पोलिसांनी सहकारी सोसायटीची निवडणूक जिंकल्याचा आनंदोत्सव फटाके फोडून साजरा केल्याने संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपविली आहे, त्यांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडावा, ही आश्चर्याची व खेदजनक बाब म्हणावी लागेल. भरदिवसा फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही सोमवारी (दि.२१) चक्क पोलिसांनी सहकारी सोसायटीची निवडणूक जिंकल्याचा आनंदोत्सव फटाके फोडून साजरा केल्याने संताप व्यक्त होत आहे.जिल्हा पोलीस क्रेडिट सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून विजयाचा आनंद साजरा केला ते योग्य होते; मात्र या आनंदाचे उधाण इतके वाढले की पोलिसांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आणि त्यांनी चक्क भरदिवसा रस्त्यावर फटाक्यांची लांबच लांब लड पेटवून बार उडवून दिला. यामुळे आता नेमकी कोण कोणावर कारवाई करणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाºया पोलीस दलातील काही कर्मचाºयांना मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या फटाके वाजविण्याविषयीच्या बंदीचा विसर कसा पडला? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस कर्मचाºयांनी विजयाचा आनंदोत्सवात मात्र भर दुपारी फटाके फोडल्याने हा न्यायालयाचा आदेशाचा अवमान मानला जात आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार करणार असून संबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे मानव उत्थान मंचाचे जसबीर सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक