शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात विणकरांसाठी सहयोग शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:57 IST

येवला : पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने शहरातील पैठणी विणकरांसाठी येथील चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात पैठणी हस्तकला सहकार्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पैठणी विणकर दिगंबरसा भांडगे, भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला सुरु वात करण्यात ...

येवला : पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने शहरातील पैठणी विणकरांसाठी येथील चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात पैठणी हस्तकला सहकार्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पैठणी विणकर दिगंबरसा भांडगे, भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला सुरु वात करण्यात आली. इग्नूच्या विभागीय संचालक एस. सौनंद, राष्ट्रीय हातमाग विकास वरिष्ठ अधिकारी उपेंद्र बहिरे, भारत विमा निगमचे अधिकारी रवींद्र कानपूरकर, टेक्सटाइल इन्स्पेक्टर गजानन पात्रे, मास्टर प्रिंटर नामदेव शेटे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ललित भांडगे, दत्ता हंडी, रमेशसिंग परदेशी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी, पैठणी उद्योजक मनोज दिवटे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापक पी. एल. सिंघल यांनी प्रास्ताविक केले. हातमाग विकास महामंडळाच्या वतीने उपस्थित अधिकारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डी. जी. महाले यांनी सूत्रसंचालन केले.