शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलांना लाभासाठी आधारची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:18 IST

राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाने १ एप्रिलपासून महिलांना आधार कार्डशिवाय सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक बालकांना आणि स्तनदा मातांना,

ठळक मुद्देनिर्णय मागे घ्या : राष्टÑवादी महिलांचे साकडे

नाशिक : गरोदर व स्तनदा मातांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण विकास विभागाने आधारची सक्ती केली असून, त्यामुळे कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सक्ती मागे घेण्याची विनंती केली आहे.यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाने १ एप्रिलपासून महिलांना आधार कार्डशिवाय सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक बालकांना आणि स्तनदा मातांना, गरोदर महिलांना या मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे. विशेषत: बेघर, स्थलांतरित आणि रहिवासी पुरावा नसलेल्या गरीब कुटुंबांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. हे अन्नसुरक्षा कायद्याचे सरळसरळ उल्लंघन असून, मूलभूत मानवी हक्काची पायमल्ली आहे. संपूर्ण राज्यात बाल अर्भक मृत्यूंमुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. यासाठी केंद्र सरकारने वरील दोन्ही योजना सुरू केल्या आहेत आणि आता त्या आधार कार्डशिवाय जर गरिबांना उपलब्ध होणार नसतील तर जीवन जगविण्यापेक्षा ओळख पत्रालाच सरकारने जास्त महत्त्व दिल्याचे दिसते. राज्यात वर्षाच्या कालावधीत २४,२०० बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. जो अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्टÑवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, सलमा शेख, रंजना गांगुर्डे, शाहिन शेख, निमा जवादे, शकिला शेख, संगीता गांगुर्डे, कामिनी वाघ आदी महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक