शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून दसाणा धरणाचे पुरपाणी अखेर सुकड नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:29 IST

विरगाव : दसाणा धरणाचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्याच्या कामाला अखेर यश आले आहे. लोकसहभागातून तसेच विरगाव येथील शेतकरी वर्गांच्या सहकार्यातून हा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे विरगाव, वनोली, तरसाळी व औंदाणे येथील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतीला जीवदान मिळणार आहे.

विरगाव : दसाणा धरणाचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्याच्या कामाला अखेर यश आले आहे. लोकसहभागातून तसेच विरगाव येथील शेतकरी वर्गांच्या सहकार्यातून हा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे विरगाव, वनोली, तरसाळी व औंदाणे येथील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतीला जीवदान मिळणार आहे.बागलाण तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या दसाणा लघुमध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ७९ दलघफु असून दरवर्षी हा प्रकल्प काठोकाठ भरून ओसांडत असतो. या प्रकल्पातून दरवर्षी कान्हेरी नदीपात्राद्वारे लाखो लिटर पाणी वाहून जात असते. हेच पुरपाणी विरगाव येथील ब्रिटिशकालीन पाटाद्वारे सुकड नाल्यात टाकून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांचा पाणीप्रश्न सोडवावा अशी मागणी या परिसरातून केली जात होती. यासाठी खालील गावातील शेतकरी वर्गाने अनेक वेळा संबंधित विभागाकडे लेखी मागणीही केली होती. मात्र यात समाधानकारक तोडगा निघत नसल्याने डोळ्यासमोर वाहून जाणारे पुरपाणी पाहण्याशिवाय या भागातील जनतेला गत्यंतर नव्हते. चालू वर्षी मात्र तरसाळी व औंदाणे या गावातील शेतकरीवर्गाने याप्रश्नी समाधानकारक तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला असता विरगाव येथील शेतकरीवर्गांचे मन वळविण्यात अखेर त्यांना यश आले आहे. यासाठी विरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, तरसाळीचे प्रगतिशील शेतकरी सुधाकर पाटील, तुषार खैरणार आदींसह गावागावातील शेतकरी वर्गांची शिष्टाई कामी आली आहे. संपूर्ण तालुक्याभरात गत महिनाभरापासून संततधार चालू असून कान्हेरी नदीला सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पुरपाणी चालू आहे. यातूनच गत महिन्याभरापासून हे पुरपाणी लोकसहभागाच्या जोरावर सुकड नाल्यात टाकण्यात आले असून यातून वनोली येथील खडक्या बंधाऱ्यासह विरगाव तसेच तरसाळी येथील लोकसहभागातून तयार करण्यात आलेले नालाबांध भरले गेले आहेत. शनिवारपासून हे पुरपाणी औंदाणे गावाकडे मार्गस्थ झाले आहे. कुठलीही शासकीय मदत न घेता हा नदी जोड प्रकल्प स्थानिक शेतकरीवर्गाने यशस्वी करून दाखविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक