शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी सुनीता देवरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:30 IST

सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार दिलीप बोरसे यांच्या निकटवर्तीय वीरगाव गणाच्या संचालक सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांची मंगळवारी (दि. १६) बिनविरोध निवड करण्यात आली.

सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार दिलीप बोरसे यांच्या निकटवर्तीय वीरगाव गणाच्या संचालक सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांची मंगळवारी (दि. १६) बिनविरोध निवड करण्यात आली.डांगसौंदाणे गणाचे संचालक संजय सोनवणे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी आज मंगळवारी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची विशेष सभा घेण्यात आली.रिक्त पदासाठी वीरगाव गणाच्या संचालक सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांनी निर्धारित वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांना अनुक्रमे श्रीधर कोठावदे, संजय देवरे हे सूचक व अनुमोदक होते. सौ. देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी सौ. देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याने मावळते सभापती संजय सोनवणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले, तर प्रशासनातर्फे सचिव भास्करराव तांबे, ब्राह्मणगाव गटाच्या वतीने प्रशांत बच्छाव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मावळते सभापती सोनवणे, संचालक संजय देवरे, नरेंद्र अहिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसभापती प्रभाकर रौंदळ, ज्येष्ठ संचालक श्रीधर कोठावदे, मधुकर देवरे, तुकाराम देशमुख, पंकज ठाकरे, प्रकाश देवरे, सरदारिसंग जाधव, जयप्रकाश सोनवणे, संजय बिरारी, संदीप साळी, केशव मांडवडे, रत्नमाला सूर्यवंशी, वेणूबाई सोनवणे यांच्यासह वीरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, विनोद अहिरे, किरण अहिरे, मुन्ना सूर्यवंशी आदी उपस्थित होते.आमदार दिलीप बोरसे, प्रशांत बच्छाव, संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून बिनविरोध निवडीचा पायंडा पाडला आहे. यंदाही हा पायंडा कायम असून, आज सकाळी शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र दोधेश्वर मंदिरात सभापतिपदासाठी इच्छुक असलेले संजय देवरे, पंकज ठाकरे, नरेंद्र अहिरे, सुनीता देवरे या चौघांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. याच्यात सौ. देवरे यांचे नशीब उजळले. गेल्या वर्षी चांदवड येथील रेणुका मंदिरात संजय सोनवणे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना रेणुकामाता प्रसन्न झाली तर आता देवरे यांना भगवान शिवजी प्रसन्न झाल्याची चर्चा होती.

टॅग्स :Nashikनाशिक