देवळाली कॅम्प : संसरीच्या उपसरपंचपदी अनिल परशराम गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संसरीचे उपसरपंच संतोष गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच निर्मला गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी अनिल गोडसे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. बैठकीला ग्रामपंचायत सदस्य युवराज गोडसे, संजय गोडसे, कांताबाई गोडसे, अंजना गोडसे, सुनीता गाडेकर, संजना गुंबाडे, सविता गोडसे, कैलास गायकवाड, विनोद गोडसे, संध्या कटारे, एच. एस. गायकवाड आदि उपस्थित होते.
संसरी उपसरपंचपदी अनिल गोडसे
By admin | Updated: November 10, 2015 23:17 IST