शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

भिडे गुरुजींपर्यंत समन्स पोहचलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:34 IST

नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे शुक्रवारी (दि़१९) न्यायालयात गैरहजर राहिले़ न्यायालयाचे समन्स अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचले नसल्याने पुन्हा समन्स काढण्यात आले

नाशिक : नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे शुक्रवारी (दि़१९) न्यायालयात गैरहजर राहिले़ न्यायालयाचे समन्स अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचले नसल्याने पुन्हा समन्स काढण्यात आले असून, त्यावर येत्या २ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे़ भिडे गुरुजी यांच्याविरोधात नाशिक महापालिकेने खटला दाखल केला असून, त्यावरील सुनावणीत हे आदेश देण्यात आले़ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे़  नाशिकमधील सभेत आंबे खाल्ल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते़ या वक्तव्याबाबत ‘लेक लाडकी अभियानतर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास सदरील वक्तव्याची खातरजमा करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त संचालकांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने त्यासंदर्भात भिडे गुरुजी यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले; परंतु भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही, वा चौकशीलाही ते उपस्थित न राहिल्याने महापालिकेने यासंदर्भातील अहवालासह नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला़

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका