शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

नाशिककरांना उन्हाचा चटका; उष्म्याने नागरिक त्रस्त; रस्ते पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:17 IST

आज संध्याकाळी पारा अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या हवामान निरिक्षण केंद्राकडून कमाल-किमान तपमान जाहीर केले जाणार आहे; मात्र मंगळवारच्या तुलनेत आज प्रखर ऊन जाणवत असल्याने पारा ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे पारा ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यतामंगळवारच्या तुलनेत आज प्रखर ऊन

नाशिक : मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर उन्हाच्या चटक्याने कमालीचे त्रस्त झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकल्याने वातावरणात उष्मा प्रचंड प्रमाणात जाणवू लागला आहे. बुधवारी (दि.२८) उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.चालू महिन्याचा पंधरवडा उलटत नाही तोच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्यास सुरूवात झाली. नाशिक शहराचे तपमान तीस अंशापुढे सरकले. कमाल तपमानात सातत्याने वाढ होऊ लागल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. मार्चअखेर तपमान जिल्ह्यात चाळीशीपर्यंत पोहचले आहे तर शहरात चाळीशीच्या जवळपास आले आहे. मंळवारी कमाल तपमान ३८.५ अंश इतके नोंदविले गेले होते. आज संध्याकाळी पारा अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या हवामान निरिक्षण केंद्राकडून कमाल-किमान तपमान जाहीर केले जाणार आहे; मात्र मंगळवारच्या तुलनेत आज प्रखर ऊन जाणवत असल्याने पारा ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकूणच नाशिक ऊन्हामुळे तापले आहे. कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही वाढत असल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. हवेतील गारवा जवळपास संपुष्टात आला असून दुपारनंतर वारादेखील उष्ण स्वरुपाचा वाहू लागल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नागरिक शक्यतो बारा वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळत आहे. घराबाहेर पडताना नाशिककर योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहे. एकूणच वाढत्या तपमानामुळे पुढील दोन महिने नाशिकरांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

 

-साप्ताहिक कमाल तपमान असे...(अंशात)दिनांक - तपमान२१ -        ३३.८२२ -        ३३.०२३ -        ३३.७२४ -        ३६.३२५ -        ३७.३२६ -        ३८.१२७ -३८.५