शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

सभापती आडके यांची सारवासारव ; दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:08 IST

कालिदास कलामंदिरचे भाडे किती ठेवावे, याबाबत हातात निर्णय असताना अल्पसाथ देणाऱ्या सभापती हिमगौरी आडके यांनी नंतर मात्र आता दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी त्यांनी जनस्थानच्या कलावंतांना बोलावून चर्चा केली आणि सायंकाळी नाट्य परिषदेलाही दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले.

नाशिक : कालिदास कलामंदिरचे भाडे किती ठेवावे, याबाबत हातात निर्णय असताना अल्पसाथ देणाऱ्या सभापती हिमगौरी आडके यांनी नंतर मात्र आता दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी त्यांनी जनस्थानच्या कलावंतांना बोलावून चर्चा केली आणि सायंकाळी नाट्य परिषदेलाही दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कलावंत आणि पालिका वर्तुळातही उलट-सुलट चर्चा होत आहे.  कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केल्यानंतर मनपाने त्याचे दर चार हजारांवरून तीस हजार रुपयापर्यंत नेले असून, आॅर्केस्ट्राचे दर चाळीस हजारांपर्यंत नेले होते. या प्रस्तावाला कलावंतांनीही कडाडून विरोध केला. हा प्रस्ताव स्थायी समितीवर मांडण्यात येणार असल्याने अंतिमत: लोकप्रतिनिधीच निर्णय घेतील त्यामुळे दिलासा मिळेल, अशी कलावंतांना अपेक्षा होती; परंतु गेल्या आठवड्यात स्थायी समितीने सर्वाधिकार सभापतींना दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाचीच री ओढत अल्पसे दर कमी केले त्यामुळे पुन्हा एकदा कलावंतांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात आयुक्तांना तीन दिवसांचा अल्टिमेटम कलावंतांनी दिल्यानंतर बुधवारी (दि. २६) सभापती हिमगौरी आडके यांनी जनस्थानच्या निवडक कलावंतांना बोलावून घेतले आणि चर्चा केली. यावेळी तांत्रिक बाजू समजावून घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सदानंद जोशी, विनोद राठोड यांच्यासह अन्य कलावंत यावेळी उपस्थित होते. दुपारी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली हिमगौरी आडके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत बेणी, सुनील ढगे, जयप्रकाश जातेगावकर, राजेंद्र जाधव, उमेश गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.नि:शुल्क कार्यक्रम असेल तर?महापालिकेने कालिदासचे दर ठरवितानाच पाचशे रुपयांपेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त असे दोन निकष लावले आहेत. मात्र, गायन, नृत्य किंवा अन्य अनेक कार्यक्रम मोफत असतात मग भाडे ठरविताना त्यांना कोणता निकष लावणार? असा प्रश्न जनस्थानच्या कलावंतांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाartकला