शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या पाळणारी सुमनबाई बनली मोहेगावची कारभारीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

नांदगाव : महिनाभर सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपली आणि सरपंचपदाची लगबग सुरू झाली. आरक्षण पडले आणि 'तिचे' ...

नांदगाव : महिनाभर सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपली आणि सरपंचपदाची लगबग सुरू झाली. आरक्षण पडले आणि 'तिचे' नशीब फळफळले. लोकशाहीचे फळ मोहेगावच्या सुमनबाईपुढे अलगद येऊन पडले. अनुसूचित जातीसाठी राखीव सरपंचपदाचा अनपेक्षित लाभ पदरी पडल्याने शेळी पालन करणारी व प्रसंगी शेतावर मजुरी करणारी महिला सुमनबाई आनंदित झाल्या.

‘पाटलाची सून’ नसली तरी, मोहेगावची प्रथम नागरिक होण्याचा मान तिला मिळाला.

अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या सरपंचपदाची चिठ्ठी निघाली. तेव्हा या पदावर एकमेव दावेदार असलेली सुमनबाई मात्र आपल्या झोपडी समोरच्या गोठ्यात शेळीचे दूध काढत होती. तिचे माहेर नांदगाव तालुक्यातल्या भौरी गावाचे. माहेरी असताना रानात शेळ्या चारायला जायची आणि सासरीसुद्धा तसेच जीवन वाट्याला आले. परिस्थितीमुळे चार बुकंही शिकू न शकलेली 'ती' निरक्षरच राहिली. सरपंचपदाच्या सहीचा अधिकार.... होय... सरपंचपदाचा अंगठा तिच्या नशिबाने तिला मिळाला.

आपल्याला गावचे सर्वात मोठे पद मिळाले, याची तिला जाणीव आहे. गावाचा विकास कसा करायचा, याचे मोठे ज्ञान नसले तरी, आपल्या आदिवासी वस्तीत रस्ते, गटारी झाल्या पाहिजेत, दिवाबत्ती पेटली पाहिजे, असे तिला वाटते.

इन्फो

गाव विकासाची तळमळ

विकासाच्या नावाने बोट मोडता-मोडता आरक्षणामुळे अंगठ्याचा ठसा किती महत्त्वाचा झाला आहे, याची जाणीव तिला झाली असली, तरी तिच्या अंगठ्याच्या जोरावर सत्तेत आलेल्या मंडळींनी गावचा विकास करावा, असे तिला वाटले, तर ते वावगे ठरू नये. गाव विकासाची तळमळ तिच्या प्रत्येक शब्दांतून व्यक्त होते. एकलव्याला आदर्श मानून त्याची पूजा करणारी सुमनबाई व तिची जातकुळी. गुरुदक्षिणेपोटी अंगठा गमवावा लागणाऱ्या एकलव्याची वेळ तिच्यावर येऊ नये. गावच्या विकासासाठी तिचा अंगठा उमटला जावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

फोटो - ०८ सुमनबाई नांदगाव

शेळीचे दूध काढताना मोहेगावची सरपंच सुमनबाई थेटे.

===Photopath===

080221\08nsk_9_08022021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०८ सुमनबाई नांदगाव शेळीचे दूध काढतांना मोहेगावची सरपंच सुमनबाई थेटे.