शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

कळवण तालुक्यात रविवारी जाणवला शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:18 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  कळवणकर हादरले आहे. या पार्श्वभूमीवर बंदमुळे ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद दुकाने, शटरडाऊन बाजारपेठ अशा वातावरणात रविवार बंदला कळवण  शहरात व तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला.            नागरिकच नव्हे, तर वाहनेसुद्धा बाहेर पडली नाहीत. रविवारी कळवण शहर व तालुक्यात  शुकशुकाट जाणवला. पोलीस रस्त्यावर असल्यामुळे नागरिक घरात होते आणि रस्ते ओस पडल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देपोलीस रस्त्यावर, नागरिक घरात, रस्ते पडले ओस 

कळवण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  कळवणकर हादरले आहे. या पार्श्वभूमीवर बंदमुळे ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद दुकाने, शटरडाऊन बाजारपेठ अशा वातावरणात रविवार बंदला कळवण  शहरात व तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला.            नागरिकच नव्हे, तर वाहनेसुद्धा बाहेर पडली नाहीत.रविवारी कळवण शहर व तालुक्यात  शुकशुकाट जाणवला. पोलीस रस्त्यावर असल्यामुळे नागरिक घरात होते आणि रस्ते ओस पडल्याचे चित्र होते.कळवण शहरात शुक्रवारी रात्री ८ पासून सुरू झालेली शांतता रविवारच्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. शिवाय, सोमवारपासून पुन्हा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनेने जनता कर्फ्यू पुकारल्यामुळे आता रविवार, दि. १८ पर्यंत कळवणच्या मेन रोडवर नीरव शांतता दिसेल.कळवणच्या मेन रोड, बसस्थानक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, गांधी चौक, गणेशनगर, शिवाजीनगर, ओतूर रोड अशा सर्व ठिकाणी नेहमी नागरिकांची गर्दी असते. शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी या परिसरात शुकशुकाट होता. रस्ते, चौक, भाजी मंडई सर्व ओस पडलेली होती.वीकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवार सकाळपासून शहरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकच बाहेर न पडल्यामुळे पोलिसांनी कधी सावली तर कधी उन्हात उभे राहून जागता पहारा दिला. त्यामुळे रस्ते ओस पडले, वाहनेदेखील रस्त्यावर दिसली नाही. सर्व खासगी वाहतूकदेखील बंद होती. नागरिक घरात राहिल्यामुळे अपवाद वगळता वाहने रस्त्यावर दिसली. वीकेण्ड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून सकाळपासूनच कळवण  शहरात पोलीस यंत्रणेची  मजबूत फळी उभारल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.विणाकारणा फिरणाऱ्यांना समजशासनाने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने ठरावीक व्यक्ती वगळता सर्व मार्गावर शुकशुकाट पसरला होता. अधूनमधून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच चारचाकींना करडी नजर असलेल्या पोलिसांकडून हटकण्यात येत होते. प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस चांगलीच समज देत होते.  

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या