शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:41 IST

ओझर (नाशिक)- एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होवून कोसळले.

ओझर (नाशिक)- एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. त्यातील दोन वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरले. सदर घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजता घडली. ओझर येथील धावपट्टीवरून उड्डाण केलेले एचएएलचे सुखोई विमान काही तांत्रिक बाबीमुळे कोसळल्यामुळे परिसरात जोरदार आवाज झाला.जमिनीवर आपटताच आगीचे लोळ पसरले होते. आवाजामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणीच्या पाच किलोमीटर अंतरावर वावी ठुशी भागात सदर विमान कोसळले असले तरी यातील वैमानिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने ते सुखरूप आहेत. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती तर एचएएलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सदर घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून विमान कोसळतात मोठा आवाज झाला. त्यात विमान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सदर लढाऊ विमान संदीप ढोमसे यांच्या द्राक्ष बागेवर कोसळले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक