शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सुस्थितीतील आरोग्य उपकेंद्र दाखविले गळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:51 IST

मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नूतनीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या आरोग्य केंद्राची पाहणी केली असता इमारत कुठेही गळत नसल्याची बाब समोर आली आणि बोगस अंदाजपत्रकाचा कारनामाही समोर आला.

ठळक मुद्देभांडाफोड : प्रत्यक्ष पाहणीत आढळले; कारनामा उघड

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नूतनीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या आरोग्य केंद्राची पाहणी केली असता इमारत कुठेही गळत नसल्याची बाब समोर आली आणि बोगस अंदाजपत्रकाचा कारनामाही समोर आला.मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या (क्र .२) नूतनीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. बुधवारी मालेगाव येथील रूरबन योजनेची बैठक आटोपल्यानंतर मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी अचानक या केंद्राला भेट देऊन अंदाजपत्रकात नमूद कामांची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेल्या उपकेंद्राच्या गळतीबाबत स्पष्टीकरण करताना यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. गळती शोधण्यासाठी डॉ. गिते यांनी चक्क उपकेंद्राच्या इमारतीवर चढून पाहणी केली असता त्यांना तेथे गळतीसारखे काहीही आढळले नाही. सदर उपकेंद्रात प्रस्तावित केलेल्या कामांची तपासणी करून नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी यंत्रणेला दिले. राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत आरोग्य विभागात पायाभूत सुविधा विकास कक्ष स्थापन करण्यात आला आहे.या कक्षाच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णालयांमधील कामांचे नूतनीकरण करण्यात येते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत दाभाडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या (क्र.२) नूतनीकरणासाठी अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. डॉ. गिते यांनी प्रत्यक्ष उपकेंद्राला भेट देऊन तसेच अन्य अभियंत्यांकडून अंदाजपत्रकाबाबत खात्री केली असता जादा रकमेचे अंदाजपत्रक सादर केल्याचे निदर्शनास आले.विशेष म्हणजे उपकेंद्रास गळती असल्याचे अंदाजपत्रकात नमूद असताना गळती नेमकी कोठे होते याचे उत्तर संबंधिताना देता आले नाही. उपकेंद्रामधील आरोग्य सेविकेच्या निवासस्थानी जाऊन डॉ. गिते यांनी माहिती घेतली असता त्यांनी इमारत गळत नसल्याचे सांगितले.इमारतीवर चढण्याची कसरतच्आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीत गळती होत असल्याचे सांगितल्याने डॉ. गिते यांनी इमारतीवर चढून पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इमारतीवर चढण्यासाठी जिना नसल्याने तसचे शिडी उपलब्ध नसल्याने त्यांना वरती चढता येत नव्हते; मात्र त्यांनी मोठा स्टूल मागवून स्लॅबला धरून ते इमारतीवर चढले आणि त्यांनी गळतीच्या ठिकाणाची पाहणी केली; मात्र तेथे काहीच आढळून आले नाही. याबाबत उपअभियंता व शाखा अभियंता यांना नव्याने मूल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य