नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी व निफाड या सधन तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केल्याची घटना घडली असून, चालू महिन्यातील पहिल्याच आठवड्यात तीन शेतकऱ्यांनी लागोपाठ आत्महत्त्या केल्याचे उघड झाले आहे. निफाड तालुक्यातील दारणा सांगवी येथील वाल्मीक रामनाथ मुळक (३८) व दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील दिनेश मोतीराम गुंबाडे असे आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. दोघांनीही राहत्या घरात गळफास घेतला आहे. वाल्मीक मुळक यांच्या वडिलांच्या नावावर साडेसहा लाखांचे शेतीकर्ज आहे. या दोन्ही घटनांनी जिल्ह्णात चालू वर्षी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १९ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत लागोपाठ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्यामुळे यंदाही गेल्या वर्षीचाच कित्ता गिरविला जातो काय अशी भीती व्यक्त केली जात असून, उपाययोजनांबाबत प्रशासनही संभ्रमात सापडले आहे.
जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या
By admin | Updated: April 7, 2017 02:35 IST