शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या रुग्णाची नाशकात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:43 IST

मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहिमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसºया मजल्यावरील कक्षाची काच फोडून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देडायलिसिस सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

नाशिक : मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहिमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसºया मजल्यावरील कक्षाची काच फोडून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.याबाबत माहिती अशी, रहिमखान हे मालेगावमधील गुलशननगर येथील रहिवासी असून, त्यांना मूत्रपिंडाचा विकार असल्यामुळे उपचारासाठी संदर्भ सेवा रुग्णालयात नातेवाइकांनी शुक्रवारी दाखल केले होते. शुक्रवारी त्यांच्यावर एक डायलिसिसची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधार होऊ लागली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. उपचाराचा भाग म्हणून शनिवारी े डायलिसिस करण्यासाठी त्यांना अतिदक्षता विभागातून कक्षात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हलविण्यात आले. डायलिसिसची प्रक्रिया सुरू होऊन तीन तास उलटले होते; मात्र अचानकपणे रहिमखान यांनी संतापून डायलिसिस प्रक्रिया बाधित केली आणि खिडकीजवळील रुग्णाच्या खाटेवर चढून डोक्याने जोराची धडक मारून खिडकीची काच फोडली व तेथून खाली उडी घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.तिसºया मजल्यावरून उडी घेतल्याने रहिमखान गंभीर जखमी झाले होते. ही घटना लक्षात येताच सुरक्षारक्षक व डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना जखमी अवस्थेत उचलून तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले व उपचारास सुरुवात केली; मात्र जबर मार व रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.आजारपणाला कंटाळूनच त्यांनी अशाप्रकारे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकSuicideआत्महत्या