सोनांबे : येथील २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आयटीआय शिकलेला नीलेश सुकदेव पवार (२२) हा युवक माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कामाला होता. गुरुवारी दुपारी बेंदवाडी मळ्यातील आपल्या राहत्या घरी कोणी नसताना नीलेश याने छताला गळफास घेतला. दुपारी तीन वाजता घरातील इतर सदस्य आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलीस पाटील चंद्रभान पवार यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी मयत नीलेश याच्याजवळ ‘माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये’ अशा आशयाची चिठ्ठी आढळून आल्याचे समजते.
सोनांबे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या
By admin | Updated: September 9, 2016 01:05 IST