शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मालेगावी एकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST

---- मालेगावतून दुचाकी चोरी मालेगाव : शहरातील भामेश्वर कॉम्प्लेक्स समोरून ३५ हजार रुपये किमतीची होण्डा दुचाकी (एमएच १५ जीटी ...

----

मालेगावतून दुचाकी चोरी

मालेगाव : शहरातील भामेश्वर कॉम्प्लेक्स समोरून ३५ हजार रुपये किमतीची होण्डा दुचाकी (एमएच १५ जीटी ९१०९) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. नितीन दगडू गवळी या शिक्षकाने कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

----

सोयगावी हाणामारी; दंगलीचा गुन्हा

मालेगाव : शहरातील सोयगाव येथील गिरणा स्टीलजवळ आयोध्यानगर भागात आगेवेताळ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हाणामारी झाली असून, याप्रकरणी छावणी पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जीवन बाबू नागरे (रा. बॅंक कॉलनी) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी किशोर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही व इतर ५ जण, रा. आयोध्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मंदिराचे काम सुरू असताना आरोपींनी आरडाओरड केली म्हणून फिर्यादीने तू इथून निघून जा, असे सांगितल्याच्या कारणावरून वाद झाला. आरोपीने फिर्यादीला मंदिर तुमचे आहे का, आम्ही काहीही करू, असे सांगून हुज्जत घातली. आरोपी क्रमांक २ ते ७ यांनी फिर्यादीस मारहाण केली व जिवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक जगताप करीत आहेत.

----

मालेगावी करीम नगरात हाणामारी

मालेगाव : मागील भांडणाची कुरापत काढून करीमनगर भागात चहाच्या हॉटेलवर हाणामारी झाली असून, कटरने वार करून एकास जखमी केल्याप्रकरणी आझादनगर पोलिसांत अब्दुल रशीद, जहीर अहमद व जहीर अहमदसोबत असलेला अनोळखी मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नवीद अख्तर गुलाम इद्रीस यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस नाईक सय्यद करीत आहेत.

----

मालेगावी गांधी कपडा मार्केटमध्ये हाणामारी

मालेगाव : शहरातील गांधी कपडा मार्केटजवळ गांधी चौकात मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी अज्जू पहिलवान यांचा मुलगा इज्जु, मज्जु दुधवाला यांचा मुलगा सिज्जु, छोटा पहिलवान (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शेख जमील अब्दुल अजीज (रा. शब्बीरनगर) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली. फिर्यादीचा भाऊ अकील याच्याशी झालेल्या मागील भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण केली. लोखंडी पाइप डोक्यात मारून जखमी केले. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.

--------

दुचाकीच्या धडकेने दोघे जखमी

मालेगाव : मनमाड रस्त्यावर वऱ्हाणे शिवारात टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले असून याप्रकरणी तालुका पोलिसांत टेम्पो (एमएच ०४ एफपी १६८९) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपाली राजाराम खरात (रा. डिसोजा मैदान, मनमाड) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व जखमी राहुल अशोक पांडे हिरो होंडा दुचाकी (एमएच ४१ एवाय ८७११) वर मनमाडकडून मालेगावकडे येत होते. मालेगावकडून मनमाडकडे जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने दोघे जखमी झाले.