शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०१ शेतकºयांची आत्महत्या आकडा शंभरीपार : पंधरा वर्षांतील उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:34 IST

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील यशवंत दत्तू ढोकणे या शेतकºयाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांतील हा उच्चांक मानला जात असून, आगामी निवडणुकीत हा राजकीय मुद्दा होण्याची शक्यता व्यक्त केली जात ...

ठळक मुद्देजिल्ह्यात १०१ शेतकºयांची आत्महत्या आकडा शंभरीपार : पंधरा वर्षांतील उच्चांक

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील यशवंत दत्तू ढोकणे या शेतकºयाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांतील हा उच्चांक मानला जात असून, आगामी निवडणुकीत हा राजकीय मुद्दा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यशवंत दत्तू ढोकणे (६५) यांच्या नावावर बारा ते तेरा हेक्टर क्षेत्र शेवगे दारणा व पळसे येथे असून, त्यांच्या नावे आयडीबीआय बॅँकेत सात ते आठ लाख रुपये कर्ज आहे तसेच सोसायटीचेही तीन लाख रुपये कर्ज आहे. ते स्वत: बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ढोकणे यांनी घराच्या मागच्या पडीक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आला. ढोकणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून, कर्जबाजारीपणामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्णात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, दर महिन्याला सरासरी आठ ते दहा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत.विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षीदेखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतकºयांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे. शुक्रवारी मालेगाव तालुक्यातील अस्ताने येथील प्रल्हाद नथू अहिरे (६०) यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या शंभर झाली होती, त्यात शनिवारी यशवंत ढोकणे यांच्या आत्महत्येने भर पडली आहे. नाशिक तालुका त्या मानाने सधन मानला जात असतानाही शेतकºयाने आत्महत्या केल्याने एकट्या तालुक्यात चार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.राज्यात सन २००२ पासून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, तेव्हापासून त्यात सातत्याने वाढच होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर अखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र समाधानकारक पाऊस व शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने हा विषय आगामी निवडणुकांमध्ये राजकीय मुद्दा होण्याची शक्यता आहे.